![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2025/02/1-708490376-380x214.avif?width=380&height=214)
Airport Gold Smuggling: मुंबई विमानतळावर एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडच्या एका कर्मचाऱ्याने सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्याची चोरीची कल्पना पाहून अधिकारीही हैराण झाले होते. अधिकाऱ्यांनी वैयक्तिक तपासणी केली असता त्याने तीन अंडरवेअर घातलेले आढळले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने प्रवाशांकडे सोने आढळले. कर्मचाऱ्याने चौकशी दरम्यान तस्करीचे सोने विमानतळाबाहेर नेल्याची कबुली दिली आहे . एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडच्या कर्मचाऱ्याला सोन्याच्या तस्करीच्या टोळीचा भाग असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली होती. कस्टम अधिकाऱ्यांनी ग्राहक सेवा कार्यकारी मयूर कोराडे (३१) याला टी-२ टर्मिनलच्या प्रस्थान क्षेत्रात अटक केली आहे. मयूर कोराडे हा एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये कंपनी ग्राउंड हँडलिंग सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून कार्यरत होता.
संयुक्त अरब अमिरातीहून कोलंबोला जाणाऱ्या एका प्रवाशाकडून सोने घेतल्याची कबुली त्याने दिली. सीमा शुल्क विभागाने कोराडे यांच्याविरोधात सोन्याच्या तस्करीचा गुन्हा दाखल केला आहे. आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांमधून सोन्याची अवैध वाहतूक केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. मात्र, कोराडे यांचे वकील आफताब कुरेशी यांनी या अटकेला कडाडून विरोध करत ही अटक बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे.