अहमदनगर: कुटुंबाला अन्नातून विषबाधा, बहिण-भावाचा जागीच मृत्यू
Food poisoning (Photo Credits: Pixabay)

एका कुटुंबाला अन्नातून विषबाधा (Food Poisoning) झाली असून, या कुटुंबातील लहान बहिण भावाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या चिमुकल्यांचे आई-वडील दोघेही अत्यावस्त आहेत. ही घटना अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात घडली. प्राप्त माहितीनुसार, संगमनेर (Sangamner) येथील मालदा रोड (Malda Road) येथे दीपक सुपेकर आणि त्यांचे कुटुंबीय राहात होते. या कुटुंबातीलच चार जणांना विषबाधा झाली. दरम्यान, सुपेकर कुटुंबीयांना नजिकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल आहे.

प्राप्त माहितीनुसार, सुपेकर कुटुंबीय हे सोमवारी रात्री एकत्र जेवले. जेवण झाल्यावर ते नेहमीप्रमाणे झोपी गेल. मात्र, सकाळी झोपेतून उटताना या कुटुंबाला अतिसार आणि उलटीचा त्रास सुरु झाला. दरम्यान, या कुटुंबातील दोन लहान चिमुकल्या बहीण भावाचा मृत्यू झाला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे सुपेकर कुटुंबीय घाबरुन गेले. दरम्यान, आजुबाजूच्या लोकांनी सुपेकर कुटुंबीयांना रुग्णालयात दाखल केले. (हेही वाचा, Winter Food: मक्याच्या पिठाची पोळी खाल्ल्याने शरीराला मिळतात आवश्यक सत्व; जाणून घ्या 'हे' भन्नाट फायदे आणि रेसिपी (Watch Video))

दरम्यान, सुपेकर कुटुंबीय हे मोलमजूरी करुन आपला चरितार्थ चालवतात. हातावरचे पोट असल्याने घरची परिस्थितीही साधारणच आहे. त्यामुळे सातत्याने आर्थिक दडपणाखाली असलेल्या कुटुंबावर या घटनेने घाला घातला आहे. दरम्यान, अन्नातून विषबाधा होण्याचे नेमके कारण काय हे मात्र समजू शकले नाही. पोलीस पुढील तपास करत आहेत.