
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा तर सरकार दरबारी देण्यात आला आहे पण प्रत्यक्षात अजूनही मराठीला दुय्यम वागणूक मिळत असल्याने सध्या अनेक ठिकाणी मराठी भाषिक आणि परप्रांतीय यांच्यामध्ये वाद रंगताना दिसत आहेत. मुंबई मध्ये मराठी बोललीच गेली पाहिजे या मागणीवर आग्रही असलेल्या मनसे कडून आता पवईत एका सुरक्षा कर्मचार्याला मारहाण करण्यात आली आहे. एल अॅन्ड टी चा सुरक्षा कर्मचारी मराठीत बोलत नसल्याने त्याला मनसैनिकांनी धारेवर धरले असता 'मराठी गेलं तेल लावत' असं तो बोलून गेला आणि त्यावरून त्यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचं पहायला मिळालं आहे.
सोशल मीडीयामध्ये सुरक्षारक्षकाला मारहाण झाल्याचा व्हिडिओ वायरल होत आहे. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, पवईच्या एल अँड टी कॅम्पसमध्ये एका व्यक्तीने मराठी भाषेबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले होते, गार्डने भाषेवर टीपण्णी केली त्यानंतर तिथे उपस्थित मनसे कार्यकर्त्यांना याची माहिती मिळाली. नंतर त्या गार्ड सोबत असलेले अन्य लोक मध्ये पडले आणि गार्ड ने माफी मागितल्याचं समोर आलं आहे. अशाप्रकारे मनसे कार्यकर्त्यांनी लोकांना मारहाण केल्याची ही पहिलीच घटना नव्हे. D-Mart Employee Slaped by MNS: मुंबईत मराठी बोलण्यास नकार, हिंदीची आरेरावी; डी-मार्ट कर्मचाऱ्यास मनसे कार्यकर्त्यांकडून प्रसाद.
मनसे सैनिकांनी दिला चोप
मुंबई के पवई में मराठी नहीं आने पर गार्ड की पिटाई
- MNS कार्यकर्ताओं पर लगा गार्ड की पिटाई का आरोप@vishalpandeyk @namrataforNews#Mumbai #Powai #Maharashtra #MaharashtraNews #Marathi #MNS pic.twitter.com/t92JGbeMJH
— ABP News (@ABPNews) April 1, 2025
दरम्यान गुढी पाडव्याच्या भाषाणामध्येही राज ठाकरे यांनी मनसैनिकांना मराठी भाषेबद्दल आग्रही राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. महाराष्ट्रात मराठी बोलली गेलीच पाहिजे असे ते म्हणाले आहेत. बॅंकांपासून मराठी कामकाजात आहे का? याची माहिती घेण्याच्या सूचना राज ठाकरेंनी दिल्या आहेत.