आरे जंगलातील (Aarey Jungle) वृक्ष तोडीला अनेक लोकांनी विरोध केला आहे. यामध्ये नागरीक, बॉलिवूड कलाकार आणि राजकीय नेत्यांनीही आरे जंगलातील वृक्ष तोडीला विरोध केला आहे. यातच शिवसेनेचे (Shivsena) युवा नेते आणि महाराष्ट्राचे (Maharashtra) पुढील मुख्यमंत्री म्हणून ओळखले जाणारे अदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनीही आरे जंगलातील वृक्ष तोडीला विरोध दर्शवला आहे. शिवसेना नागरिकांच्या मुलभूत सुविधांना विरोध करत नाही, परंतु पर्यावरणाला (Environment) धोकाही पोहचवू देणार नाही, असे ते म्हणाले आहेत. ही कारशेड अन्य ठिकाणी हलवावी लागली तर, हा मुंबई मेट्रो-3 प्रकल्प (Mumbai Metro-3 Project) कधीच पूर्ण होऊ शकणार नाही, अशी शक्यता मेट्रो रेल्वे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक यांनी व्यक्त केली.
मेट्रोला विरोध नाही, मात्र आरे कारशेडला विरोध आहे असे सांगताना आदित्य ठाकरे यांनी मुंबईत सुरु असलेल्या कोणत्याही पायाभूत सुविधांच्या कामांना आम्ही विरोध केला नसल्याचे सांगितले मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी मेट्रो-३ प्रकल्पासाठी आरे परिसरात कारशेड उभारणे सर्वाधिक सोयीचे आहे. हा कारशेड अन्य ठिकाणी हलवावी लागली तर, हा प्रकल्प कधीच पूर्ण होऊ शकणार नाही, अशी शक्यता व्यक्त केली आहे. कारशेडसाठी आरे ऐवजी कांजूरमार्गचा प्रस्ताव पुढे केला जात असल्याच्या मुद्यावर त्यांनी हे मत व्यक्त केले. हे देखील वाचा-महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक 15-20 ऑक्टोंबर दरम्यान होण्याची शक्यता- चंद्रकांत पाटील
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही आरे जंगलाचे समर्थन केले होते. त्यांच्या पक्षाचे नगरसेवक कप्तान मलिक यांनी वृक्ष तोडीला समर्थन दिल्यामुळे सुप्रिया सुळे यांनी कप्तान मलिक यांच्याकडे राजीनाम्याची मागणी केली होती. मुंबईतील हे ऐकमेक जंगल आहे. मुंबई शहराच्या अनेक भागातून आरे जंगलातील वृक्ष तोडीला विरोध दर्शवला जात आहे.