अभिनेते आणि गांधी हत्येचे समर्थक शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) कार्यालयात जाऊन एका कार्यक्रमाला हजेरी लावली. पोंक्षे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात हजेरी लावल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या. राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवत चर्चाही सुरु झाल्या. राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी तर थेट टीका केली. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण देत 'प्रख्यात अभिनेते शरद पोंक्षे यांचा राष्ट्रवादीशी कधीच संबंध नव्हता, आणि यापुढेही कधीच नसेल', असे म्हटले आहे.
बॅकस्टेज कलाकारांना कोरोना व्हायरस काळात तीस लाखांहून अधिक रकमेची आर्थिक मदत राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने करण्यात आली. या मदतीबद्दल आभार मानण्यासाठी नाट्य परिषद पदाधिकारी, नाट्य परिषद अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्यासोबत शरद पोंक्षे हे पक्ष कार्यालयात आले होते. या पलिकडे शरद पोंक्षे यांचा आणि पक्षाचा कोणताही संबंध नाही व कधीच नसेल, असं जयंत पाटील स्पष्टपणे सांगितले आहे. (हेही वाचा, महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2020: राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी महाविकासआघाडी घटक पक्षांमध्ये रस्सीखेच)
ट्विट
महात्मा गांधींची हत्या हे भारतातील पहिले दहशतवादी कृत्य होते. गांधींच्या हत्येचे समर्थन करणारे विचार, हेदेखील निश्चितच विकृत विचार आहेत, अशी माझी ठाम धारणा आहे. राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने बॅकस्टेज कलाकारांना कोरोना काळात तीस लाखांहून अधिक रकमेची आर्थिक मदत करण्यात आली.
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) June 24, 2020
दरम्यान, जयंत पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून स्पष्टीकरण देताना टोलाही लगावला आहे. जयंत पाटील यांनी म्हटले आहे की ''महात्मा गांधी यांची हत्या हे भारतातील पहिले दहशतवादी कृत्य होते. गांधींच्या हत्येचे समर्थन करणारे विचार, हेदेखील निश्चितच विकृत विचार आहेत, अशी माझी ठाम धारणा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा गांधीवादी विचारांचा पक्ष आहे. गांधी हत्येचे समर्थन करणाऱ्या व्यक्तीवर गांधीवादी लोकांनी केलेल्या मदतीबद्दल आभार मानण्याची वेळ यावी, हाच महात्मा गांधींच्या विचारांचा विजय आहे''. (हेही वाचा, Mahatma Gandhi 150th Birth Anniversary: महात्मा गांधीं विषयी 10 अचंबित करणा-या गोष्टी)
ट्विट
याबद्दल आभार मानण्यासाठी शरद पोंक्षे हे नाट्य परिषद पदाधिकारी, नाट्य परिषद अध्यक्ष श्री. प्रसाद कांबळी यांच्यासोबत पक्ष कार्यालयात आले होते. यापलीकडे शरद पोंक्षे यांचा आणि पक्षाचा कोणताही संबंध नाही व कधीच नसेल.
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) June 24, 2020
ट्विट
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा गांधीवादी विचारांचा पक्ष आहे. गांधीहत्येचे समर्थन करणाऱ्या व्यक्तीवर गांधीवादी लोकांनी केलेल्या मदतीबद्दल आभार मानण्याची वेळ यावी, हाच महात्मा गांधींच्या विचारांचा विजय आहे.
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) June 24, 2020
जयंत पाटील यांनी ट्विटरद्वारे स्पष्टीकरण देताच जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत ''राष्ट्रवादी पक्षाच्या व्यासीठावर वर विकृत शरद पोंक्षे येणे हे क्लेश कारक दुर्दैवी होते. पण पुरोगामी कार्यकर्त्यां चा आक्रोश जयंत पाटील ह्यांच्या कानी पडताच त्यांनी पक्षाची भूमिका अत्यंत तत्परतेने स्पष्ट केली. आभार. असे म्हटले.
ट्विट
राष्ट्रवादी पक्षाच्या व्यासीठावर वर विकृत शरद पोंक्षे येणे हे क्लेश कारक दुर्दैवी होते
पण पुरोगामी कार्यकर्त्यां चा आक्रोश @Jayant_R_Patil ह्यांच्या कानी पडताच त्यांनी पक्षाची भूमिका अत्यंत तत्परतेने स्पष्ट केली #आभार pic.twitter.com/XXQegGKJcz
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 24, 2020
शरद पोंक्षे ह एक अभिनेता आहेत. चित्रपटांपेक्षा नाट्यसृष्टीत त्यांचे विशेष नाव आहे. प्रदीप दळवी लिखित आणि विनय आपटे दिग्दर्शित ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकाने त्यांना विशेष ओळख मिळवून दिली. पोक्षे हे आपण सावरकरवादी असल्याचे सांगतात. तसेच, त्यांनी गांधी हत्येचे नेहमीच समर्थन केले आहे.