Accident Representational image (PC - PTI)

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर (Mumbai-Pune Expressway) आज दोन ट्रकच्या भीषण अपघात (Accident) एका जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही दुर्देवी घटना आज सकाळी साडेसातच्या सुमारास घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी अपघाती मृत्युची नोंद केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्यावर थांबलेल्या एका ट्रकला पाठिमागून येणाऱ्या दुसऱ्या ट्रकने धडक दिली. ज्यात एकाचा मृत्यू तर, दुसऱ्या ट्रकचालक गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरिफ शेख असे मृत ट्रकचालकाचे नाव आहे. तर, संतोष गुप्ता असे जखमी झालेल्या दुसऱ्या ट्रकचालकाचे नाव आहे. पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर रसायनी पोलीस स्टेशन हद्दीत आरिफने ट्रक थांबवली होती. तसेच गाडी खाली उतरून टायर चेक करू लागला. परंतु, त्यावेळी अचानक पाठिमागून आलेल्या दुसऱ्या ट्रकने आरिफच्या ट्रकला जोरदार धडक दिली. त्यामुळे थांबलेला ट्रक पुढे गेला आणि दुसऱ्या ट्रकच्या चाकाखाली आल्याने आरिफ शेखचा जागीच मृत्यू झाला. तर, पाठीमागून धडक देणाऱ्या ट्रकचा चालक संतोष कुमार गुप्ता या अपघातात गंभीर जखमी झाला असून त्याला एमजीएम कामोठे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यासंदर्भात लोकसत्ताने वृत्त दिले आहे. हे देखील वाचा- Ulhasnagar: खळबळजनक! प्रियकराच्या मदतीने एका अल्पवयीन मुलीने केली स्वत:च्या आईची हत्या; उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी येथील घटना

याआधीही गेल्या दोन आठवड्यापूर्वी मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर एका कंटेनर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका ट्रकवर जाऊन जोरात आदळला होता. या अपघातात दोन्ही वाहनांना आग लागली होती. या आगीत ट्रकमधील ड्रम फुटला होता. यामुळे भडकलेल्या आगीत ट्रक जळून खाक झाला होता. सुदैवाने या अपघात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले होते.