Accident | Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे (Mumbai–Pune Expressway) खालापूर टोल नाका (Khalapur Toll Naka) नजीक झालेल्या भीषण अपघातात 2 जण ठार तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव वेगात असलेल्या एका ट्रेलरने पुढे जाणाऱ्या टेम्पो आणि स्विफ्ट कारला पाठिमागून धडक दिल्याने हा अपघात ( Accident) झाला. ही घटना सोमवारी (29 जून 2020) सकाळच्या प्रहरी घडल्याची माहिती आहे. मृतांची ओळख अद्यापही पटली नाही. पोलीस तपास करत आहे.

दरम्यान, भीषण अपघातात मृतांच्या शरीराचा अक्षरशः चेंदामेंदा झाल्याने त्यांची ओळख पटवण्यात पोलिसांना अडथळा येत आहे. त्यातच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. त्यामुळे गर्दीला पांगवण्याचे अतिरिक्त काम पोलिसांना करावे लागत आहे. अपघातग्रस्त टेम्पो रस्त्यावर अडवा पडला आहे. त्यामुळे एका बाजूची वाहतूक पूर्णपणे थांबवावी लागली आहे.

महामार्ग पोलीस आणि आयआरबी घनास्थळी दाखल झाले असून, बचत आणि मदत कार्य सुरु आहे. अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरुन बाजूला घेऊन रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचे काम सुरु आहे. तसेच, जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृतांचे मृतदेहही पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.