मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गावर अपघात; जखमींच्या मदतीसाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेस कार्यकर्त्या सरसावल्या
Accident on Mumbai-Pune Express Highway (PC - Twitter)

मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गावर (Mumbai-Pune Express Highway) लोणावळा घाटात अपघात झाला. या अपघातानंतर अपघातग्रस्त वाहनाच्या चालकास मदत करण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या सरसावल्या. त्यांच्या या सामिजिक कार्यांची दखल राष्ट्रवादी नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी घेतली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून या घटनेचे काही फोटो पोस्ट करत महिला कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.

सुप्रिया सुळे यांनी अपघातासंदर्भात केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गावर लोणावळा घाटात अपघातग्रस्त वाहनाच्या चालकास प्रचंड वेदना होत असतानाही त्याच्या मदतीसाठी कुणीही थांबत नव्हते. परंतु, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या डॉ. अमृता मेणकुदळे, श्रीया भोसले, आरती हुळ्ळे, किर्ती मोरे यांनी गाडी थांबवून त्याला मदत केली.' (हेही वाचा - आरोग्याच्या प्रश्नावर रोहित पवार यांचा केंद्र सरकारवर निशाणा; सोशल मीडिया पोस्टवरून सांगितली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चूक)

त्या ट्रकचालकावर प्रथमोपचार करुन त्याला धीर दिला. माणूसकीच्या जाणिवेतून त्यांनी केलेल्या या मदतीबद्दल या सर्वांचे कौतुक वाटते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती नेहमीचं अशा प्रकारे आश्वासक अशा समाजोपयोगी कार्यात अग्रेसर असतात याचा आम्हाला अभिमान वाटतो, असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. याशिवाय राष्ट्रवादी नेते अमोल कोल्हे यांनीदेखील सुप्रिया सुळे यांनी शेअर केलेल्या पोस्टला रिट्विट करत मदत करणाऱ्या राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.