 
                                                                 Mumbai Accident: मुंबई येथील मुलुंडचा राजा गणेश मंडळाच्या दोन स्वयंसेवकांवर एकाने बीएमडब्यू कारने उडवले. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला असून एकाचा मृत्यू झाला. या अपघाताप्रकरणी बीएमडब्यू चालकाला अटक केले आहे. आरोपीला पोलिसांनी अटक करत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. (हेही वाचा- गाझियाबादमध्ये भीषण रस्ता अपघात, बसने स्कूटरला दिली धडक, दोघांचा मृत्यू)
मिळालेल्या माहितीनुसार, प्रीतम थोरात या स्वयंसेवकांपैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दुसऱ्या प्रसाद पाटील यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी रविवारी दिली.मुंलूड पूर्वेकडील गव्हाणापाडा परिसरातील आकृती टॉवर जवळ हा अपघात झाला. पहेटा ४ च्या सुमारासा हा अपघात घडल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती नवघर पोलिसांना देण्यात आली.
अपघात घडला तेव्हा अपघातग्रस्त गणेशोत्सवासाठी स्वयंसेवा करत होते आणि परिसरात बॅनर लावत होते. प्रीतम मचानच्या शिडीवर होता आणि प्रसाद मदत करत होता. त्याचवेळीस भरधाव कार अनियंत्रत झाली आणि या कारची थेट दोघांना धडक लागली. ही धडक इतकी भीषण होती की, प्रीतम शिडीवरून रस्त्यावर पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून पळून गेला. पीडितांना सावरकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचारादरम्यान प्रीतमचा मृत्यू झाला. प्रसादला सुरुवातीला गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आणि नंतर ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरु केला. सीसीटीव्ही फुटेजचा वापर करून आरोपीला शोधण्यात आले. शक्ती असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केले. आरोपीने गुन्ह्याची कबुली केली.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
