माळशिरस: माजी आमदार दिलीप माने यांच्या वाहनाला अपघात; एक जण ठार
Dilip Mane (Photo Credit: Facebook)

देवदर्शनासठी निघालेल्या सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने (Dilip Mane) यांच्या वाहनाची आणि दुचाकीची धडक (Car Accident) झाली आहे. हा अपघात माळशिरस (Malshiras) तालुक्यातील तांदुळवाडी परिसरातजवळ मंगळवारी दुपारी 12 च्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकीस्वराचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात दिलीप माने आणि त्यांच्या वाहन चालकाला किरकोळ जखम झाली आहे. दरम्यान दिलीप माने यांच्या वाहनाचे अधिक नुकसान झाले आहे. या अपघाताची माहिती कळताच स्थानिक पोलिसांनी संबंधित ठिकाणी धाव घेतली आहे.

माजी आमदार दिलीप माने कुटुंबासह आपल्या खाजगी वाहनाने म्हसवड येथे देवदर्शनासाठी निघाले होते. पंरतु, म्हसवड येथे जात असताना माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी परिसरात एक दुचाकी अचानक दिलीप माने यांच्या वाहनाच्या समोर आली. दरम्यान, दिलीप माने यांच्या वाहनाची आणि दुचाकीची जोरदार धडक झाली. त्यावेळी दिलीप माने यांच्यासह त्यांच्या चालकालाही किरकोळ जखम झाली. मात्र, दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर प्राथमिक उपचार घेऊन दिलीप माने सोलापूरला परत येत असल्याचे सांगण्यात आले आहे. हे देखील वाचा- नागपूर: भरघाव ट्रकची खाजगी वाहनाला धडक; दोघांचा मृत्यू, 10 जण जखमी

शहाजी राऊत असे मृत व्यक्तीचे नाव आहे. शहाजी 55 वर्षीय असून ते माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी गावात राहत होते. या अपघाताच दिलीप माने यांचे वाहन इनोव्हाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच या घटनेमुळे आजूबाजुच्या परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.