Karad Bus Fire News

Accident News: राज्यात ठिकठिकाणी अपघाताची  (Accident) मालिका सुरुच आहे. काल रात्री १२च्या दरम्यान पुण्याला जाणाऱ्या खासगी बसचा अपघात झाला या घटनेत प्रवाशी जखमी झाल्याची माहिती मिळाली, ही घटना ताजी असताना पुणे शहराजवळील खंडाळा घाटा (Khandala) जवळ एसटीचा अपघात झाला आहे. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. गुरुवारी सकळी एसटी बस स्वारगेटहून अलिबागाल निघाली होती. बस खंडाळा येथे येताच अपघात झाला. बस चालकाच नियत्रंण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावर गेली.

सुत्रांना मिळालेल्या माहितीनुसार, खंडाळा घाटात मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग व द्रुतगती मार्ग यांचा सामाईत पॉईंट असलेल्या अंडा पॉईंट येथे बसचा अपघात झाला. बस अनियंत्रित झाल्याने मातीच्या ढीगाऱ्यावर गेली. या घटनेत कोणतीही मोठी दुर्घटना झाली नाही. या अपघातात प्रवाशी सुखरुप आहे. (हेही वाचा- लातूरहून पुण्याला जाणाऱ्या ट्रॅव्हल्साचा अपघात, आठ ते दहा जण जखमी)

पुणे - बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅव्हल्सला आग

पुणे- बंगळुर राष्ट्रीय महामार्गावर तासवडे टोलनाकापाशी ट्रॅव्हल्सला आग लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बसने अचानक पेट घेतल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही अशी माहिती तळबीड पोलिसांनी माध्यमांना दिली आहे. बसचा टायर फुटल्याने बसला आग लागल्याचे प्रथमदर्शींनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रॅव्हल्स बस सकाळी पहाटेच्या सुमारास आग लागली. या घटनेची माहिती कळताच घटनास्थळी तळबीड पोलिस तात्काळ मदतीसाठी धाव घेतला.

वेळीच बसमधील प्रवाशी बसमधून उतरले त्यामुळे या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु खासगी बस या आगीत संपुर्ण जळून खाक झाली आहे. आग विझवण्यासाठी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. रस्त्यावर बऱ्याच वेळ वाहतुक सेवा विस्कळीत झाली होती. पोलिस कर्मचाऱ्यांनी वाहतूक सेवा सुरळीत केली.