राज्यभरात उन्हाच्या झळा वाढत आहे. राजधानी मुंबई शहरातही तापमान मोठ्या प्रमाणावर वाढू लागले आहे. परिणामी नेहमी मुंबई लोकलने प्रवास करणारे मुंबईकर आता वातानुकुलीत लोकल ट्रेनला (Mumbai AC Local Train) प्राधान्य देऊ लागले आहेत. पाठिमागील काही दिवसांपासून मध्य रेल्वे (Central Railway) आणि पश्चिम रेल्वे (Western Railway) मार्गावरील वातानुकूलित रेल्वे (AC Trains) सेवांच्या मागणीत आणि तिकीटांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. एसी लोकल तिकीटांमध्ये झालेली हंगामी वाढ ही वाढत्या तापमानात प्रवासी गारेगार प्रवासाला प्राधान्य देत असल्याचे दर्शवत आहे. रेल्वेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, पश्चिम रेल्वे मार्गावर 1 एप्रिल रोजी सुमारे 30,000 प्रवाशांनी तिकिटे खरेदी केली आणि 3,500 हून अधिक प्रवाशांनी वातानुकूलित लोकल ट्रेनसाठी सीझन पास बुक केले. तर मध्य रेल्वेनेही त्याच दिवशी वातानुकूलित ट्रेनसाठी 2,400 सीझन पासची विक्री नोंदवली, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.
मार्च अखेर आणि एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच वातानुकुलीत लोकल तिकीटांच्या विक्रीत वाढ पाहायला मिळू लागली. खास करुन 1 एप्रिल रोजी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे अशा दोन्ही मार्गांवर मुंबई एसी लोकल गाड्यांसाठी सीझन तिकीट विक्रीमध्ये लक्षणीय वाढ पाहायला मिळाली. पश्चिम रेल्वेने 3,561 प्रवाशांनी सीझन तिकीट विक्री केल्याचा विक्रमी आकडा नोंदवला, तर मध्य रेल्वेने त्याच दिवशी 2,434 तिकीट विक्री केली. जे मार्चच्या आकडेवारीच्या तुलनेत 2.5 पटींनी अधिक आहे. (हेही वाचा, Mumbai Ac Local: मुंबईत दरवाजा उघडा ठेवून धावली एसी लोकल, तांत्रिक बिघाडानंतर सेवा रद्द (व्हिडिओ पहा))
पश्चिम रेल्वे जवळपास 96 एसी सेवा चालवते. ज्यातून प्रतिदिन सरासरी 100,000 प्रवासी प्रवास करतात, तर मध्य रेल्वे दररोज अंदाजे 56,000 प्रवाशांना सेवा देणाऱ्या 66 सेवा चालवते. 1 एप्रिल रोजी वाढलेल्या मागणीमुळे प्रश्चिम रेल्वेने 2.39 लाख प्रवाशांना वातानुकुलीत सेवा दिली. तर मध्य रेल्वेमार्गावरुन जवळपास 1.57 लाख प्रवाशांनी गारेगार प्रवास केला. वातानुकुलीत रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये वाढ झाल्याला रेल्वे प्रवक्त्यांनीही दुजोरा दिला आहे. प्रवक्त्यांनी सांगितले की, मार्च महिन्यात पश्चि मरेल्वेने प्रवाशांसाठी दररोज सरासरी 1,450 सीझन तिकीट आणि मध्य रेल्वेसाठी 950 बुकिंग झाले बुकींग झाले. त्या तुलनेत एप्रिल महिन्यात हा आकडा चांगलाच वधारला आहे. (हेही वाचा, Mumbai AC Local: स्टेशन आलं पण एसी लोकलचं दार उघडलचं नाही, संतापात पुढच्या स्टेशनला प्रवाशांनी मोटरमॅनला कोंडलं)
दरम्यान, पश्चिम रेल्वेने मार्च महिन्यात प्रतिदिन सरासरी 1,450 सीझन तिकिटांची विक्री केली. तर मध्य रेल्वेने याच समांतर काळात सुमारे 950 होती इतकी प्रतिदिन तिकीट विक्री नोंदवली. सीझन तिकीट बुकिंगमध्ये वाढ झाल्यामुळे या एसी सेवांमध्ये प्रवाशांची संख्याही वाढली आहे.