Dharashiv Crime: धाराशिवात मजूर महिलेवर अत्याचार, पोलिसावर गुन्हा दाखल, घटनेनंतर गावात खळबळ
Representative Image

Dharashiv Crime:  धाराशिव जिल्ह्यात एका पोलिस कर्मचाऱ्यांने मजूर महिलेवर अत्याचार केल्याचे धक्कादायक माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. दोन आरोपी पोलिसांवर भूम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. ही घटना २ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घगावातीलीडली आहे. धाराशिवात आष्टावाडी शिवारात पोलिसाने पीडित महिलेवार अत्याचार केल्याचे तीनं तक्रारीत म्हटलं आहे.या घटनेअंतर्गत पोलीस कर्मचारी दगडू सुदान भुरके व खासगी जीप चालक सागर चंद्रकांत माने या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.( हेही वाचा- प्रेयसीबद्दल अनुद्गार, 24 वर्षीय तरुणाची हत्या)

मिळालेल्या माहितीनुसार, गावातील पीडीत महिला ऊसतोड कामगार आहे. तीला आणि तीच्या दीराला बार्शीत जायचे होते त्यामुळे ते भूम बसस्थानकात दुपारच्या वेळीस थांबले होते. दरम्यान, दोन पोलिस कर्मचारी तिथे आले आणि पीडित महिलेला कोठून आलात ? इथं कशासाठी थांबलात? तुम्ही चोर दिसतायं? असे म्हणू लागला त्यांना लुबड्यासाठी बराच प्रयत्न केला आणि त्या जीप मध्ये घेऊन गेला. जीप मध्ये सोडून देण्यासाठी त्याच्याकडून १० हजार रुपयांची मागणी केली. त्यांनी  ऊसतोड मुकादम यांना फोन करून मोबाईलवर पैसे पाठवले. पैसै मिळाल्यानंतर पुढे जाऊन दोघांना सोडलं.

पीडित महिला आणि तीचा दीर दोघें ही पुन्हा बस स्टॅडवर येऊन थांबले, काही वेळाने पोलिस कर्मचारी भुरके पुन्हा बस स्टॅंडजवळ आला आणि तेथे थांबू नका, तुम्हाला दुसरे पोलिस घेऊन जातील, मी तुम्हाला आष्टावाडी येथे सोडतो. असं म्हणत, दोघांना घेऊन गेला. थोड्याच वेळाने एक फोन येतो. फोन ठेवल्यानंतर मॅडमला तुम्हाला भेटायचं आहे असं म्हणत दीराला खाली उतरवतो. आणि पीडित महिलेला घेऊन जातो. पुढे एका ज्वारीच्या शेतात महिलेवर बळजबरीने तिच्यावर अत्याचार करतो आणि घटनास्थळावरून फरार होते. या घटनेची पीडित महिलेने माहिती पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.