Sambhaji Nagar Shocker: औरंगाबाद (Aurangabad) म्हणजेचं नामांतरणानंतरचे छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथील एका मदरशात (Madrasa) क्रूरतेची घटना समोर आली आहे. घड्याळ चोरल्याच्या आरोपावरून एका विद्यार्थ्याला मदरशाच्या मौलवींनी बेदम मारहाण केली. आरोपी मौलवीने विद्यार्थ्याला लाथाने मारहाण केली. इतकचं नाही तर मौलवी विद्यार्थ्यावर थुंकला. शिक्षकाच्या या कृत्याने क्रौर्याची परिसीमा गाठली. कुटुंबीयांनी मौलवीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पीडित विद्यार्थी सुरतची रहिवासी आहे. औरंगाबादच्या जामिया बुरहानुल उलूम मदरशामध्ये तो शिक्षण घेत होता. 16 वर्षीय विद्यार्थ्यावर मदरशाजवळील दुकानातून भिंतीवरील घड्याळ चोरल्याचा आरोप करण्यात आला आहे. चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये विद्यार्थ्याला दुकानातून घड्याळ चोरताना दुकानदाराने पाहिल्यानंतर त्यांनी मदरशाच्या मौलवींकडे तक्रार केली. (हेही वाचा -Mumbai News: बॉल पकडण्याच्या नादात जीव गमावला, छतावरून पडून 15 वर्षीय मुलाचा मृत्यू)
मदरशाच्या मौलवींनी विद्यार्थ्याला दिली क्रूर शिक्षा -
मदरशातील विद्यार्थ्याला चोरी करताना पाहून मौलवी मौलाना सय्यद उमर अली यांनी विद्यार्थ्याला क्रूर शिक्षा दिली. मौलवीने प्रथम विद्यार्थ्याकडून चोरीचे घड्याळ जप्त केले. त्यानंतर मौलवींनी विद्यार्थ्याला अर्धनग्न केले आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. एवढेच नाही तर मौलवी विद्यार्थ्यावर थुंकला. (हेही वाचा- वादातून कात्र्या पोटात खुपसलेल्या अवस्थेमध्ये सापडला तरूण; विलेपार्लेमधील घटना)
दरम्यान, मौलवीच्या विद्यार्थ्यासोबतच्या क्रूरतेचे सीसीटीव्ही फुटेज कुटुंबीयांना मिळताच ते संतापले. कुटुंबीयांनी तात्काळ पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी मौलवीविरुद्ध अल्पवयीन विद्यार्थी कस्टडी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.