महिलांवर होणारा अत्याचार रोखण्यासाठी प्रशासनाकडून अनेक प्रयत्न केले जात असताना भररत्स्यात एका महिलेचा विननभंग केल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना पुण्यातील (Pune) नवी पेठ येथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे त्याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी हा एका हॉटेलमध्ये काम करत आहे. पीडित तरूणी कामावरून घरी जात असताना त्याने भररस्त्यात तिचा विनयभंग केल्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. सदाशिव पेठेत गेल्या आठवड्यातच तरुणींनाकडे पाहून अश्लील हातभाव केल्याची घटना घडली होती. यामुळे पुन्हा एकदा महिला सुरक्षेतेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
राज धनशाम बहादूर थापा असे आरोपीचे नाव असून तो मुळचा नेपाळचा आहे. सध्या तो सदाशिव पेठ येथे साई शिवनेरी हॉटेलमध्ये राहत आहे. राज थापाने बुधवारी पीडित तरूणी कामावरून घरी जात असाताना तिच्याकडे बघत हसला आणि तिचा पाठलाग करू लागला. त्यानंतर पीडित तरूणी मेडिकल दुकानाजवळ गेली असताना त्याने तिचा हात पकडून विनयभंग केला. त्यावेळी पीडिताने आरडाओरडा करायला सुरूवात केली. त्यानंतर स्थानिक लोकांननी त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले. राज थापाच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुण्यासारखा शहरात तरुणींना रस्त्यावरून फिरणे अवघड होऊ लागले आहे. तसेच महिलांनी घराबाहेर पडायचे की नाही? असाही प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. हे देखील वाचा-पुणे: खेळताना तोल जाऊन नाल्यात पडल्याने 2 वर्षांचा मुलगा बेपत्ता, अद्याप शोधकार्य सुरु
देशात महिलांवर होणारे अत्याचार दिवसेंदिवस गंभीर रुप धारण करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. क्लासला जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या 21 वर्षीय तरुणीचा रिक्षात विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबई येथील उल्हासनगर येथे घडला होता.परिणामी, पीडित तरुणीने धावत्या रिक्षातून उडी मारली. त्यानंतर त्यावेळी आरोपीने तिच्यापाठोपाठ उडी घेत पुन्हा तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, रस्त्यावरील लोक जमा झाल्याने त्याने तेथून पळ काढला.