फोटो सौजन्य - ANI

पुणे अग्निशमन दलाने (Pune fire brigade) आज एका 42 वर्षीय महिलेची विहिरीतून (Well) यशस्वीपणे सुटका केली आहे. दांडेकर वाडा (Dandekar Wada) येथील विहिरीत ही महिला पडली होती. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी (Firefighters) घटनास्थळी धाव घेत अवघ्या काही मिनिटांत दोरीच्या साहाय्याने महिलेची सुटका केली. या बचाव कार्यात अधिकारी प्रमोद सोनवणे, प्रदिप खेडेकर, चालक हनुमंत कोळी, नवनाथ मांधरे तांडेल राजाराम केदारी व जवान छगन मोरे, सचिन जौंजाळे, प्रकाश शेलार, मयूर कार्ले, केतन नरके, विशाल गायकवाड यांनी सहभाग घेतला.

अग्निशमन दलाला रात्री 12.11 वाजता कॉल आला आणि 12.17 वाजता टीम घटनास्थळी पोहोचली. रात्री 12.22 वाजता महिलेला विहिरीतून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता तिची प्रकृती स्थिर आहे, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. हेही वाचा Pune: पुण्यातील अनेक भागात 11 नोव्हेंबरला पाणीपुरवठा राहणार बंद

अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, ती महिला चाळीशीच्या वयातील असल्याचे समजते. प्रमोद सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली अग्निशमन दलाच्या पथकाने आणि प्रदीप खेडेकर हे महिलेला वाचवण्यासाठी आधी घटनास्थळी गेले होते. खेडेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, अग्निशमन दलाच्या जवानांनी तिला विहिरीतून बाहेर काढले तेव्हा ती बुडत होती.