Rajgad Fort (फोटो सौजन्य - Pixabay)

Pune Shocker: पुण्यातील (Pune) वेल्हे तालुक्यातून (Velhe Taluka) अत्यंत धक्कादायक घटना समोर येत आहे. राजगड किल्ला (Rajgad Fort) पाहायला गेलेल्या 17 वर्षीय तरुणाचा डोक्यात दगड पडल्याने मृत्यू झाला. अनिल विठ्ठल आवटे असे या तरुणाचे नाव असून तो पुण्यातील धायरी येथील रहिवासी होता. प्राप्त माहितीनुसार, तो मूळचा परभणी जिल्ह्यातील (Parbhani District) खाडी गावचा (Khadi Village) रहिवासी होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 जानेवारी रोजी पुण्यातील एक ग्रूप सुट्टीनिमित्त किल्ल्यावर पर्यटनासाठी आला होता, त्यावेळी ही घटना घडली. पाली दरवाजाजवळ उतरत असताना किल्ल्यावरून एक दगड पडला आणि तो अनिलच्या डोक्यावर लागला. यात तरुणाला गंभीर दुखापत झाली आणि त्याच्या कानातून रक्त येऊ लागले. (हेही वाचा -Rajgad Fort : राजगड किल्ल्यावर यापुढे पर्यटकांना रात्रीच्या मुक्कामाला बंदी ; या कारणासाठी घालण्यात आली बंदी...)

अनिलसोबत असलेल्या त्यांच्या मित्रांनी अनिलला ताबडतोब वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. परंतु, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अनिल धायरी येथे त्याच्या काकांसोबत राहत होता. तसेच तो पोलिस भरतीची तयारी करत होता. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. (हेही वाचा -Raigad Fort Close: पर्यटकांसाठी रायगड किल्ला 31 जुलै पर्यंत बंद, जिल्ह्याधिकारांचा आदेश)

राजगड किल्ल्यावर मधमाश्यांच्या हल्ल्यात किमान 25 पर्यटक जखमी - 

काही महिन्यांपूर्वी राजगड किल्ल्यावरील बालेकिल्लाजवळ मधमाशांच्या हल्ल्यातून किमान 25 पर्यटक जखमी झाले होते. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मधमाश्यांनी बालेकिल्ला जवळ पर्यटकांवर हल्ला केला. काही पर्यटकांनी सुरक्षिततेसाठी धाव घेतली तर काहींनी मधमाशांपासून वाचण्यासाठी जवळच्या तलावात उडी मारली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे सुट्टीच्या दिवशी किल्ल्यावर भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये घबराट पसरली होती.