Raigad Fort Close: दोन दिवसांपासून राज्यात संततधार पाऊस सुरु आहे. रायगड किल्ल्यावर सुमारे १०० पर्यटक अकडल्याची माहिती समोर आली होती. या घटनेनंतर रायगड जिल्ह्याधिकाऱ्यांनी (सोमवारी) ३१ जुलैपर्यंत किल्ल्यावर संचारबंदी जाहिर केली आहे. या आदेशानंतर रायगड पोलिसांनी किल्ल्याभोवती बंदोबस्ताची व्यवस्था केली आहे. तसेच परिसरात नाकेबंदी केली आहे. (हेही वाचा- मुसळधार पावसामुळे मुंबई शहरात आज ऑरेंज अर्लट, वाचा आजचा हवामान अंदाज)
मिळालेल्या माहितीनुसार, रायगडावर सोमवारी ढगफुटी झाल्यामुळे किल्ल्याचा मुख्य रस्ता ओव्हर फ्लो झाला होता. मुसळधार पावसात अनेक पर्यटक अडकले होते. त्यामुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. पर्यटक धोकादायक मार्गावरून प्रवास करताना दिसत होते. एकाने या घटनेचा व्हिडिओ फोन मध्ये कैद करून व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. १५ ते २० मिनीट गडावर भयावह परिस्थिती होती असे पर्यटकांनी सांगितले.
पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, रायगडावर १५ पोलिस तैनात करण्यात आले होते. गडाच्या परिसरात बॅरिगेड लावण्यात आले आहे, कोणालाही गडावर जाण्याची परवानगी नाही असे पोलिसांनी सांगितले आहे. पावसाच्या स्थितीनुसार, दरवर्षी रायगड किल्ला बंद करण्यात येतो. आज रायगड परिसरात ऑरेज अर्लट जारी करण्यात आला आहे.