Rajgad Fort Pixabay

पुण्यातील (Pune) वेल्हे (Velhe) तालुक्यातील राजगड किल्ल्यावर (Rajgad Fort) यापुढे पर्यटकांना रात्रीच्या मुक्कामाला बंदी घालण्यात आली आहे. पुरातत्व विभागाने याबाबतचा आदेश जारी केला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर तीन महिने कैद आणि पाच हजार रुपयांचा दंडाच्या शिक्षेची तरतुद करण्यात आली आहे. पुरातत्व विभागाने या आदेशाच्या प्रती भोरचे प्रांताधिकारी आणि उपविभागीय दंडाधिकारी, तहसीलदार वेल्हे आणि ग्रामसेवक यांना दिल्या आहेत. ऐतिहासिक वास्तूचे जतन व संवर्धन करणे, पावित्र्य सांभाळणे, स्वच्छता राखण्यासाठी या संदर्भातील निर्णय हा घेण्यात आला आहे.

कोरोनाच्या काळात राज्यातील पर्यटनस्थळे बंद करण्यात आली होती. यामुळे अनेक गड प्रेमींची निराशा झाली होती. यामुळे निर्बंध शिथील होताच राजगडावरा पर्यटकांची गर्दी खुप मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. तसेच राजगड आणि तोरणा गड हे अगदी जवळजवळ असल्याने अनेक गड प्रेमी दोन्ही गड एकत्र सर करण्याचा प्रयत्न करतात आणि रात्रीच्या वेळी गडावरच मुक्काम करतात. शनिवारी आणि रविवारी गडावर येणाऱ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर वाढते. (Shiv Jayanti 2023: शिवजयंती आग्रा किल्ल्यावर साजरी करण्यास पुराततत्व विभाग राजी; शिवप्रेमींमध्ये आनंद)

गडावर चारशे ते पाचशे पर्यटक एकत्र आल्यानंतर प्रशासनावर देखील अधिक ताण येतो. त्यातच काही जणांकडून उघड्यावर प्रात:विधी केला जात असल्यामुळे किल्ल्याच्या परिसरात दुर्गंधी पसरते. ऐतिहासिक वास्तूचे जतन व संवर्धन करणे, पावित्र्य सांभाळणे स्वच्छता राखण्यासाठी किल्ल्यावरील सेवकांवर मोठा ताण येतो. तसेच वारंवार सूचना देऊनही पर्यटकांवर त्याचा फारसा फरक पडताना दिसत नाही त्यांच्याकडून आदेशाचे उल्लंघन हे नेहमी होताना दिसते. यामुळे आता किल्ल्यावर रात्रीच्या मुक्कामासाठी बंदी घालण्यात आली आहे.