93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर दिब्रिटो (Father Francis Dibrito) प्रकृती बिघडल्यामुळे मुंबईत परतले आहेत. उस्मानाबादमध्ये चालू असलेल्या 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या (93rd Marathi Sahitya Sammelan) सुरुवातीपासून त्यांना पाठीचा त्रास जाणवत होता. त्यामुळे दिब्रिटो यांनी आज मुंबईतील होली क्रॉस हॉस्पिटलमध्ये उपाचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सध्या फादर दिब्रिटो यांच्यावर उपचार सुरू आहेत.
फादर दिब्रिटो प्रकृती अस्वस्थतेमुळे उद्घाटनाच्या कार्यक्रमाला व्हील चेअरवर आले होते. त्यामुळे साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार का? याबद्दल शशांकता निर्माण होत आहे. शुक्रवारी उस्मानाबाद येथे सकाळी ग्रंथदिंडीद्वारे मोठया उत्साहात संमेलनाला सुरुवात झाली. प्रसिद्ध कवी पद्मश्री ना. धो. महानोर यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्धाटन करण्यात आले. (हेही वाचा - उस्मानाबाद मध्ये आजपासून 3 दिवस रंगणार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन; फादर फ्रान्सिस दिब्रिटो, ना.धो. महानोर राहणार)
शुक्रवारी सकाळी निघालेल्या या ग्रंथदिंडीमध्ये विविध देखावे, छत्रपती शिवाजी महाराज, संत गोरोबाकाका, संत गाडगेबाबा, बाल वारकरी, महिलांचे ढोल पथक, लेझीम पथक, मुलींचे बॅण्डपथक आदींनी दिंडीला चार चाँद लावले. तसेच ग्रंथदिंडीमध्ये सादर करण्यात आलेल्या देखाव्यांनी अनेकांची मने जिंकली. साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवस अतिशय उत्साहात गेला. परंतु, आज फादर दिब्रिटो यांची प्रकृती बिघडल्याने ते मुंबईला परतले आहेत.