Death | Representational Image (Photo Credits: Pixabay)

पंढरपूरच्या अरिहंत इंग्लिश स्कुलमधून एक धक्कादायक बातमी पुढे आली आहे. तिसऱ्या वर्गात शिकत असणाऱ्या चिमुकलीचा परिक्षेचा पेपर सोडवत असताना अचानक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. ९ वर्षिय अनन्या भादुले पंढरपुरातील अरिहंत इंग्लिश सकुलमध्ये शिकत होती. तरी सध्या विद्यार्थ्यांच्या घटक चाचण्या सुरु आहेत. म्हणुन विद्यार्थी जोमाने अभ्यास करताना दिसत आहे. किंवा काही विद्यार्थ्यांमध्ये परिक्षेचं मोठा तणाव बघायला मिळतो. परिक्षा सुरु असल्याने विद्यार्थ्यांना रोज शाळेत येवून पेपर देणं अनिवार्य आहे. तरी वर्ग तिसऱ्यात शिकणारी अनन्याची तबेत्त गेल्या दोन दिवसांपासून ठीक नव्हती. तरी परिक्षा सुरु असल्याने अनन्या रोज शाळेत यायची. तसेच राज्यातील विविध भागात निच्चांकी तापमानाची नोंद होत असुन पंढरपुरात देखील कडाक्याची थंडी पडताना दिसत आहे. तरी सकाळच्या शाळेला विद्यार्थी कुडकुडत शाळेत जाताना दिसतात.

 

काल वर्ग तिसरीचा मराठीचा पेपर होता. पेपर सोडवण्यासाठी अनन्या नेहमीप्रमाणे शाळेत आली आणि अर्धा पेपर सोडवला देखील पण पेपर लिहत असतानाचं अनन्याला अचानक झटका आला आणि तिचे हातपाय वाकडे झाले. तोच तिच्या वर्गातील शिक्षकांनी अनन्याला घेवून शाळेतून रुग्णालयाच्या दिशेने निघाले. काही मिनिटांनी शिक्षकांनी रुग्णालय गाठलं पण तोवर अनन्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. (हे ही वाचा:- Heart Attack In Winters: हृदयविकाराचा धोका हिवाळ्यात वाढतो? काय सांगतात हृदयविकाराचे तज्ज्ञ?)

 

तरी डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर अनन्याला अचानक ब्रेन हॅम्ब्रेजचा झटका आल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं. तरी अनन्याच्या कुटुंबियांसाठी ही घटना पायाखालची जमिन सरकावणारी होता. कारण घरातून हसत खेळत गेलेली लेक शाळेतून मृत अवस्थेत परतल्याने भादुले कुटुंबियांना मोठा झटका बसला आहे. तरी कुटुंबियांसह संपूर्ण पंढरपूर वासियांवर शोककळा पसरली आहे. गावातील चिमुकलीने असं अचानक जग सोडून जाणं ही बाब सगळ्यांच्या मनाला चटका लावून गेली आहे.