पाठिमागील काही काळापासून हृदयविकार (Heart Attack In Winters) आजाराचा सामना करणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. प्रामुख्याने हिवाळ्यात (Winters) हृदयाशी संबंधित आजार अधिक डोके वर काढतात. असेही मानले जाते की, थंड हवामानाचा हृदयावर अनेक प्रकारे परिणाम होतो. अनेकदा तर असे दिसून येते की, हिवाळ्यात हृदयविकारामुळे अनेक रुग्ण दगावतात. त्यामुळे या बाबी विचारात घेता थंड हवामानात आपण आपल्या हृदयाचे संरक्षण कोणत्या मार्गांनी करू शकतो हे समजून घेणे महत्त्वाचे ठरते. आशा वेळी डॉक्टर काय सांगतात हे पाहणेही महत्त्वाचे. वृत्तसंस्था एएनआयने हिवाळा आणि हृदयविकार याबाबत नवी दिल्ली येथील वरिष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ मनोज कुमार यांच्याकडून काही गोष्टी जाणून घेतल्या. त्या पुढीलप्रमाणे.
डॉ मनोज कुमार यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका वाढतो, वृद्धांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते परंतु आजकाल तरुणांमध्येही हे दिसून येते. हे टाळण्यासाठी हिवाळ्यात सूर्योदयापूर्वी मॉर्निंग वॉक टाळले पाहिजे. डोक्याचा पृष्ठभाग अधिक मोठा असल्याने हिवाळ्यात डोक्यातील उष्णता कमी होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे हिवाळ्यात खास करुन सुर्योदयापूर्वी घराबाहेर जाताना डोके उबदार कपड्याने पुरेसे झाकणे महत्त्वाचे ठरते, असे डॉ. कुमार सांतात. (हेही वाचा, Cold Wave in Kanpur: कानपूरमध्ये भीषण थंडी; हृदयविकाराचा झटका आणि ब्रेन स्ट्रोकमुळे 25 जणांचा मृत्यू)
हिवाळ्यात थंडी असते. थंडीमुळे शरीरातील रक्तवाहिन्या संकुचीत होतात. ज्याला व्हॅसोकॉन्स्ट्रक्शन (vasoconstriction) असे म्हणतात. ज्यामध्ये रक्तवाहिन्यांमधील पेशी अथवा स्नायू अरुंद (आकुंचन) होतात. हिवाळ्यात आपल्या शरीरातील फायब्रिनोजेनची पातळी 23 टक्क्यांपर्यंत वाढते. त्याशिवाय, प्लेटलेटची संख्या देखील वाढते. त्यामुळे रक्तदाब वाढण्याची शक्यता निर्माण होते. कधी कधी हिवाळ्यात रक्तामध्ये गुटळ्या तयार होतात. त्याशिवाय, प्लेटलेटची संख्या देखील वाढते. आणि यामुळे रक्ताची गुठळी तयार होऊ शकते आणि हृदयविकाराचा झटका येतो, असे डॉ कुमार म्हणाले.
हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग टाळण्यासाठी सावधगिरीचाउपाय म्हणून हिवाळ्यात व्हिटॅमिन डी पूरक आहार घेण्याचा सल्लाही डॉक्टर देतात. व्हिटॅमिन डीची कमतरता झाल्यानेही हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. लोकांनी हिवाळ्याच्या काळात पूरक आहार घ्यावा, असे डॉक्टर सांगतात.