Coronavirus Update: मुंबई, पुणे, अकोला, रत्नागिरीसह तुम्ही राहत असलेल्या जिल्ह्यात किती आहेत कोरोनाचे रुग्ण? जाणून घ्या एका क्लिकवर
Coronavirus (Photo Credit: Twitter)

महाराष्ट्राला लागलेले कोरोना व्हायरस (Coronavirus) या महाभयाण विषाणूचे ग्रहण काही सुटता सुटत नाहीय. महाराष्ट्र आरोग्य विभागाने (Maharashtra Health Department) दिलेल्या माहितीनुसार, काल (8 ऑगस्ट) काल दिवसभरात राज्यात 12,822 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 275 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 5 लाख 3 हजार 84 इतका झाला आहे. सध्या राज्यात 1 लाख 47 हजार 48 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात काल दिवसभरात 11,081 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण 3,38,362 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 67.26% एवढे झाले आहे.

आतापर्यंत 17 हजार 367 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर 3.45 % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 26,47,020 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 5,03,084 (19% ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 9,89,612 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 35,625 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हा व मनपा निहाय आकडेवारी (8 ऑगस्ट रात्री 8: 00 वाजेपर्यंत)

Maharashtra COVID-19 Numbers (Photo Credits: Twitter/AIR)

हेदेखील वाचा- Coronavirus Cases In Mumbai: मुंबईत आज 1 हजार 304 नवे कोरोनाग्रस्त रुग्ण, तर 58 जणांचा मृत्यू; शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 लाख 22 हजार 331 वर पोहोचली

Maharashtra COVID-19 Numbers (Photo Credits: Twitter/AIR)

राज्यात सर्वाधिक रुग्ण मुंबई शहरात असून काल दिवसभरात 1 हजार 304 नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद करण्यात आली असून 58 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 1 लाख 22 हजार 331 इतकी झाली आहे. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेने (Brihanmumbai Municipal Corporation) माहिती दिली आहे.