Coronavirus Cases In Mumbai: मुंबईकरांना गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाने झोडपून काढलं आहे. अशातचं शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्यादेखील झपाट्याने वाढताना दिसत आहे. राज्यात मुंबई, पुणे शहरात कोरोना विषाणूचे संक्रमण अधिक प्रमाणात दिसून येत आहे. मुंबईत आज दिवसभरात 1 हजार 304 नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद करण्यात आली असून 58 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 1 लाख 22 हजार 331 इतकी झाली आहे. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेने (Brihanmumbai Municipal Corporation) माहिती दिली आहे.
आज दिवसभरात मुंबई शहरातील 1 हजार 454 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. सध्या शहरात 19 हजार 932 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत शहरातील 95 हजार 354 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे त्यांना योग्य उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. (हेही वाचा - Coronavirus Cases In Maharashtra: महाराष्ट्रात आज 12,822 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, तर 275 जणांचा मृत्यू)
1,304 #COVID19 cases, 1,454 recoveries & 58 deaths reported in Mumbai today. Total number of cases in the city is now at 1,22,331 including 95,354 recoveries, 19,932 active cases & 6,748 deaths: Brihanmumbai Municipal Corporation pic.twitter.com/RJfuUzOYJX
— ANI (@ANI) August 8, 2020
मात्र, दुर्दैवाची बाब म्हणजे शहरातील 6 हजार 748 रुग्णांची कोरोनाविरुद्धची झुंज अपयशी ठरली आहे. दरम्यान, आज राज्यात 12,822 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून 275 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 5 लाख 3 हजार 84 वर पोहोचला आहे. सध्या राज्यात 1 लाख 47 हजार 48 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत 17 हजार 367 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.