Women Constables Blame On DCP Rank Officers for Rape: महाराष्ट्र पोलिस दलातील महिला कर्मचाऱ्यांनी (Women Constables) आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. 8 महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी मिळून पोलीस आयुक्त, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. या महिला कॉन्स्टेबलनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर सामूहिक बलात्काराचा (Gang Rape) आरोपही केला आहे. त्यांनी याप्रकरणी तक्रार करणारे पत्रही लिहिले आहे. महिला हवालदारांनी डीसीपी पदापर्यंतच्या अधिकाऱ्यांविरोधात (DCP Rank Officers) तक्रार केली आहे.
मुंबई पोलिसांनी आठ महिला कॉन्स्टेबल चालकांनी लिहिलेल्या या पत्राची चौकशी सुरू केली आहे, ज्यामध्ये पोलीस उपायुक्त आणि मोटार वाहन विभागाच्या दोन पोलीस निरीक्षकांविरुद्ध बलात्कार, लैंगिक छळ आणि भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. हे पत्र शनिवारी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हे पत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुंबई पोलिस आयुक्त आणि पोलिस सहआयुक्त यांना सादर करण्यात आले होते. (हेही वाचा -Nitesh Rane and T Raja Singh Booked for Hate Speech: सोलापूर येथे चिथावणीखोर वक्तव्य; भाजप आमदार नितेश राणे आणि टी. राजा यांच्यावर गुन्हा दाखल)
महिला हवालदारांनी केलेल्या आरोपानंतर आता पोलिसांवर विश्वास कसा ठेवायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रत्यक्षात महाराष्ट्र पोलिसांत हवालदार पदावर काम करणाऱ्या 8 महिला कर्मचाऱ्यांनी सरकारसह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना पत्रे लिहिली आहेत. अधिकाऱ्यांनी महिला पोलिस कर्मचाऱ्यांना त्यांच्या शासकीय निवासस्थानी नेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे या पत्रात नमूद केले आहे.
आम्ही छोट्या गावातले असल्यामुळे त्यांनी आमचा फायदा घेतला गेला. आम्हाला ड्युटीवर कोणतेही काम न देण्याच्या बहाण्याने दोन पोलिस निरीक्षकांनी आम्हाला डीसीपीच्या घरी नेले आणि त्यांनी आमच्यावर एकामागून एक लैंगिक अत्याचार केले, असं पत्रात म्हटलं आहे. (हेही वाचा - Mumbai Crime: बोरिवलीतील गेस्ट हाऊसमधून 3 बंदुका, 36 जिवंत काडतुसं जप्त, दिल्लीच्या सहाजणांना अटक)
दोन्ही निरीक्षकांनी (बलात्कार) कृत्याचा व्हिडिओ शूट केला आणि त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी आम्हाला ब्लॅकमेल केले. ते रात्री दारूच्या नशेत जाऊन आम्हाला आमचे नग्न फोटो पाठवायला सांगायचे, असंही या पत्रात म्हटलं आहे. तिन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांवरील आरोप गंभीर स्वरूपाचे असल्याने मुंबई पोलिस विभागाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.