Coronavirus in Mumbai: मुंबईत आज गेल्या तीन महिन्यात पहिल्यांदा कोरोना व्हायरसच्या 717 रुग्णांची नोंद; एकूण संक्रमितांची संख्या 1,10,846 वर
Coronavirus (Photo Credits: PTI)

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत (Mumbai) आज कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) 717 रुग्णांची व 55 मृत्यूची नोंद झाली आहे. अशाप्रकारे मुंबईमधील एकूण सकारात्मक रुग्णांची संख्या वाढून 1,10,846 झाली आहे. यामध्ये आज 2467 रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत 84411 रूग्ण बरे झाले आहेत. आजच्या 55 मृत्यूसह मुंबईमध्ये आतापर्यंत एकूण 6184 मृत्यूंची नोंद झाली आहे. आज मुंबईमध्ये 741 कोरोना व्हायरस संशयित रुग्णांची भर्ती झाली आहे. सध्या शहरामध्ये 20251 सक्रीय रुग्णांवर उपचार चालू आहेत. बीएमसीने (BMC) याबाबत माहिती दिली.

आज मृत्यू झालेल्या 42 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. यातील 38 रुग्ण पुरुष व 17 रुग्ण महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 2 जणांचे वय 40 वर्षा खाली होते, 35 जणांचे वय 60 वर्षा वर होते, तर उर्वरित 18 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते. मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर 76 टक्के झाला आहे. 21 जुलै ते 27 जुलै पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर 1.02 टक्के राहिला आहे. 27 जुलै 2020 पर्यंत मुंबईमध्ये झालेल्या कोविड च्या एकूण चाचण्या 4,94,339 इतक्या आहेत. मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर आता 69 दिवस झाला आहे. (हेही वाचा: औरंगाबाद येथे कोरोना व्हायरस उपचारासाठी 400 हून अधिक रुग्णांना ज्यादा बिल; ऑडिटनंतर रुग्णांची 24 लाखाची बचत)

एएनआय ट्वीट- 

सध्या मुंबईमध्ये सक्रिय कंटेनमेंट झोन (झोपडपट्ट्या आणि चाळी) यांची संख्या 627 इतकी असून, सक्रिय सीलबंद इमारती 6022 आहे. दरम्यान, गेले चार महिने सरकारकडून मुंबईमधील कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी आक्रमक प्रयत्न होत आहे. त्याचे फळ म्हणून आज मुंबईमध्ये फक्त 717 रुग्ण आढळले आहे. महत्वाचे म्हणजे आज मुंबईमध्ये आजपर्यंतच्या एका दिवसातील सर्वात जास्त चाचण्या, 8776 झाल्या आहेत.