Representational Image (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्र राज्यातील मुंबई, पुणे, ठाणे या शहरांत कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यातच आता पुण्यातील एका रुग्णालयात कोरोना बाधित 2 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. काल रात्री पुण्यातील एका हॉस्पिटलमध्ये 61 वर्षीय आणि 40 वर्षीय दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या मृतांसह पुणे जिल्ह्यातील कोरोना संसर्गाने बळी गेलेल्यांची संख्या 63 झाली आहे. अशी माहिती पुण्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. काल (23 एप्रिल) देखील पुण्यात 41 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला होता.

कोरोना व्हायरसवर ठोस औषध उपलब्ध नसल्याने अजूनही यावरील उपचार, उपाय याबाबत चाचण्या, प्रयोग सुरु आहेत. मात्र प्लाझ्मा थेरपीचा चांगला परिणाम होत असल्याचे निर्दशनास आले आहे. त्यामुळे आता कोरोना व्हायरसचा वाढता फैलाव रोखण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर केला जाणार आहे. पुण्यात याची संपूर्ण तयारी झाली असून ससून हॉस्पिटलमध्ये येत्या 2-3 दिवसात प्लाझ्मा थेरपी सुरु होण्याची शक्यता आहे. (पुणे मध्ये प्लाझ्मा थेरपीची तयारी पूर्ण; 'ससून' हॉस्पिटलमधून येत्या 2-3 दिवसांत सुरूवात होण्याची शक्यता)

ANI Tweet:

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत असताना पुण्यातील एका हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांची गैरसोय होत असल्याचे उघड झाले. हॉस्पिटलमधील अन्नात अळी सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र या प्रकरणाकडे विशेष लक्ष पुरवण्यात येईल, असे हॉस्पिटल प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधितांचा आकडा 6427 वर पोहचला आहे. त्यापैकी 5304 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर 840 रुग्ण यातून रिकव्हर झाले असून 283 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.