1 मे हा महाराष्ट्र (Maharashtra) राज्य स्थापनेचा 60 वा वर्धापन दिन म्हणून आज आपण साजरा करत आहोत. संयुक्त महाराष्ट्राला आज 60 वर्ष पूर्ण होत आहेत. आजचा दिवस महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी महत्वाचा दिवस आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या हुतात्म्यांना 60 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुंबईच्या हुतात्मा चौकमधील (Hutatma Chowk) त्यांच्या स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून वंदन केले. लॉकडाउनमुळे (Lockdown) आजच्या दिवशी दादरच्या शिवाजी पार्कवर होणारा शासकीय सोहळा यंदा रद्द करण्यात आला आणि त्याऐवजी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राज भवनात सकाळी 8 वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या समारंभाला महापौर किशोरी पेडणेकर, मुख्य सचिव अजोय मेहता, प्रधान सचिव आशिष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी, राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर, पोलीस महासंचालक आदी वरिष्ठ शासकीय, पोलीस अधिकारी उपस्थित होते. (महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'जय महाराष्ट्र' म्हणत मराठीतून दिल्या कामगार दिनाच्या शुभेच्छा, पाहा ट्विट)
ध्वजारोहणानंतर मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांना पुष्प वाहून अभिवादन केले. ऐरवी मोठ्या थाटात साजरा केला जाणारा आजचा दिवस कोरोना आणि लॉकडाउनमुळे अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पूर्णपणे पालन करण्यात आले. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी स्वतः वाहन चालवून हुतात्मा स्मारक आणि मंत्रालयातल्या कार्यक्रमासाठी हजेरी लावली.
#महाराष्ट्रदिन समारंभाला महापौर किशोरी पेडणेकर, मुख्य सचिव अजोय मेहता, प्रधान सचिव आशिष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी, राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर, पोलीस महासंचालक आदी वरिष्ठ शासकीय, पोलीस अधिकारी उपस्थित pic.twitter.com/OwtVlVCHZg
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 1, 2020
महाराष्ट्र निर्मितीचा हा दिवस जल्लोषाचा, अभिमानाचा असला तरीही संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न साकारण्यासाठी 107 जणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. त्यामुळे, महाराष्ट्र दिनाच्या दिवशी या हौतात्म्य पत्करलेल्या वीरांना आदरांजली देखील अर्पण केली जाते. दरम्यान, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खास मराठी भाषेत ट्विटरवरुन महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. प्रधानमंत्रीनीं आपल्या ट्विटमध्ये 'जय महाराष्ट्र'चा नारा लगावला.