Dharavi & Coronavirus | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Coronavirus Cases In Dharavi: महाराष्ट्र कोरोना विषाणूच्या विळख्यात अडकला आहे. राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या मुंबईमध्ये आढळून येत आहे. मुंबईतील धारावीत आणि वरळी भागात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. जागतिग आरोग्य संघटनेने दखल घेतलेल्या धारावीत आज 6 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

धारावीत एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 2 हजार 519 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत 2 हजार 141 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 128 कोरोना रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यासंदर्भात मुंबई महानगरपालिके (Brihanmumbai Municipal Corporation) ने माहिती दिली आहे. (हेही वाचा - Coronavirus Vaccine: भारत बायोटेक कंपनीने विकसित केलेल्या पहिल्या स्वदेशी COVAXIN लसीची 30 वर्षीय तरुणावर चाचणी)

दरम्यान, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध जिल्ह्यातील टास्क फोर्सच्या डॉक्टर्संनी मुंबईच्या राज्य टास्क फोर्सच्या डॉक्टरांशी व्हिडिओ कॉन्फर्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार सर्व जिल्ह्यांत टास्क फोर्सची स्थापन करण्यात आली आहे. यावेळी त्यांनी कोरोना रुग्णांचा मृत्यू दर शून्यावर आणणे हे एकमेव उद्दिष्ट असल्याचं सांगितलं.