-पुणे येथून कोल्हापूर मार्गाने गोव्यात येणाऱ्या बारा बस आणि गोव्याचे सुमारे 150 प्रवासी राधानगरी येथे अडकले आहेत.
-राधानगरीमधील पुराच्या पाण्यामुळे हे सर्व प्रवासी अडकल्याने त्यांच्या सुरक्षिततेसाठी बचावकार्य सुरु करण्यात आले आहे.
-पाण्याची पातळी वाढत असल्याने प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
Maharashtra Monsoon 2019 Live Updates: राधानगरीत अडकले गोव्याचे 150 प्रवासी, बचावकार्याला सुरुवात
Mumbai Rain, Rail Road Traffic Updates: मुंबई, ठाणे, पालघर भागात जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापसून सुरू असलेला पावसाचा जोर आजही कायम आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज (6 ऑगस्ट) तळकोकणामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये सक्रिय असलेल्या मान्सून मुळे सध्या मध्य महाराष्ट्र वगळता इतर सर्वत्र धुव्वाधार पाऊस बरसत असल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. तसेच अनेक ठिकाणी पाणी साचल्याने रस्स्ते, रेल्वे वाहतूक देखील कोलमडली असल्याचं चित्र आहे. Maharashtra Monsoon 2019 Forecast: दक्षिण कोकणात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार; हवामान खात्याचा अंदाज
मुंबईमध्ये लोकल रेल्वे सोबतच लांब पल्ल्याच्या गाड्यांचेही वेळापत्रक कोलमडल्याचं चित्र असल्याने सामान्यांना मोठा फटका बसला आहे. मुंबई, कोकण, नाशिक या भागामध्ये धरणं, नद्या यांनी धोक्याची पातळी ओलांडली असल्याने अनेक ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदी किनारी राहणार्या अनेक गावांना सुरक्षेच्या कारणास्तव इतरत्र हलवण्यात आले आहे.
मुंबईमध्ये लोकल ट्रेन्सचं वेळापत्रक कोलमडलं आहे. डोंबिवली, टिटवाळा येथून सुटणार्या अनेक लोकल रद्द करण्यात आल्या आहेत तर लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या वळवण्यात आल्या आहेत. पुणे, सिंधुदुर्ग भागामध्ये जोरदार पावसामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.