Rainfall (Image used for representational purpose only) (Photo Credits: PTI)

6 August Monsoon Forecast: मुंबईसह महाराष्ट्रात सुरु गेले 3 दिवस धुमशान घातलेल्या पावसाने आता काहीशी विश्रांती घेतली असून मध्यम स्वरुपाचा पाऊस सर्वत्र पडत आहे. महाराष्ट्रात पडलेल्या मुसळधार पावसामुळे संपुर्ण जनजीवन विस्कळीत झाले असून मुंबई वगळता महाराष्ट्राच्या इतर भागात पूरस्थिती परिस्थिती निर्माण झाल्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येण्यास थोडा वेळ लागेल असं काहीसे चित्र पाहायला मिळत आहे. पावसाचा जोर ओसरला असला तरीही मुंबईसह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

तर दुसरीकडे दक्षिण कोकणात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

IMD चा अंदाज:

मुंबई, कोकण आणि गोव्यात आज हलका किंवा मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Skymet चा अंदाज:

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात 100% पाऊस बरसणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

जून महिना उलटून गेला तरीही पावसाला म्हणावी तशी सुरुवात झाली नव्हती. म्हणून सर्वच जनता पावसाकडे डोळे लावून बसली होती. मात्र जुलै महिन्यात जो पाऊस सुरु झाला त्याने अक्षरश: संपुर्ण महाराष्ट्र अक्षरश: थैमान घातले. यात पाणीपुरवठा करणारी सर्व धरणे दुधडी भरून वाहत असून नद्यांनी तर अक्षरश: धोक्याची पातळी ओलांडली.