
MSCE Scholarship Result 2019: इयत्ता 5 वी आणि 8 वीचा अंतिम निकाल आज (19 जून) दुपारी 3 वाजता जाहीर होणार आहे. या निकालासोबतच विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीदेखील जाहीर होणार आहे. मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजे www.mscepune.in आणि puppss.mscescholershipexam.in यावर विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येणार आहे. 16 मे दिवशी स्कॉलरशीप परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर करण्यात आली होती. 5 वीच्या 16,589 तर 8 वी च्या 14,815 विद्यार्थी यंदा शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. महाराष्ट्र: 5 वी आणि 8 वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 26 चुकीचे प्रश्न वगळून लावणार निकाल! उत्तरसूची www.mscepune.in वर प्रसिद्ध
कसा पहाल निकाल ?
- puppss.mscescholarshipexam.in या वेबसाईट वर उजव्या बाजूला शिष्यवृत्ती निकाल फेब्रुवारी 2019 चा पर्याय आहे.
- या पर्यायावर तुम्हांला विद्यार्थ्यांचा वैयक्तिक निकाल पाहता येईल. त्यासोबतच शाळांना अंतिम निकाल या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर रोल नंबर, आईचं नाव एन्टर करून सबमीट करा
- स्क्रिनवर तुम्हांला निकाल पाहता येईल
अंतरिम निकालानंतर विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करायची असल्यास संबंधित शाळांच्या 'लॉग इन'मध्ये 16 ते 27 मे या कालावधीत ऑनलाइन अर्ज उपलब्ध करण्यास सांगितले होते त्यानुसार आज यादी जाहीर होईल.