कल्याण येथील आश्रमात काम करणाऱ्या 50 वर्षीय महिलेवर 28 वर्षीय तरुणाने केला बलात्कार; ठाणे पोलिसांकडून आरोपीला अटक
Representational Image. (Photo Credit: File Photo)

कल्याण (Kalyan) येथील आश्रमात काम करणाऱ्या एका 50 वर्षीय महिलेवर एका टुरिस्ट कॅब ड्राइव्हरने तीन महिन्यांपूर्वी बलात्कार केल्याचे वृत्त होते, याप्रकरणी ठाणे पोलिसांनी (Thane Rural Police) आता बलात्कार करणाऱ्या 28 वर्षीय तरुणाला अटक केल्याचे समजत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार ही घटना 23 जून रोजी घडली होती, पीडित महिला ही कल्याण येथील आश्रमातील आपले काम उरकून उल्हासनगर (Ulhasnagar) येथे जात असताना या तरुणाने वाटेत तिच्यावर बलात्कार केल्याचे सांगण्यात आले होते.

प्राप्त माहितीन्वये, 50 वर्षीय पीडित महिला ही रोज आश्रमातून निघाल्यावर उल्हासनगर येथील आपल्या राहत्या घरी पायी जात असे. घटना घडली त्यादिवशी देखेल ही महिला नेहमीच्या रस्त्यावरून चालत होती, इतक्यात अचानक आरोपी तरुणाने तिला झुडुपात ओढून घेतले व तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर महिला प्रचंड धक्क्यात होती, मात्र तरीही तिने तशीच उल्हासनगर येथील हॉस्पिटल मध्ये धाव घेतली. याठिकाणी तिच्यावर उपचार झाल्यावर तिने ठाणे ग्रामीण पोलिसांकडे याबाबत रीतसर तक्रार नोंदवली.Rajasthan Alwar Gangrape: नवऱ्यासमोर बायकोवर बलात्कार करुन अश्लिल व्हिडिओ व्हायरल, पोलिसांवर प्रकरण दडपल्याचा आरोप

दरम्यान, याप्रकरणी तपास करत असताना पोलिसांना अनेक अडचणी येत होत्या, ज्या परिसरात ही घटना घडली तिथे कोणत्याही प्रकारची सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते तसेच हा परिसर किंचित दूर असल्याने वर्दळही नव्हती. तरीही संधीत ठिकाणच्या लागत असणाऱ्या गावातली स्थानिकांशी बोलून पोलिसांनी आरोपीचा छडा लावला. काही स्थानिकांनी सांगितल्याप्रमाणे,या आरोपीने घटना घडल्यावर तिथून तात्काळ पळ काढला आहोत पण काही वेळाने आपले हरवलेले पॉकेट शोधण्यासाठी तो मित्रांसोबत घटनास्थळी गेला होता. यावेळी काही स्थानिकांनी त्यांना पाहिले आणि यामुळेच त्याला पकडण्यात पोलिसांना मदत झाली.