महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 साठी राज्यभरात 4739 उमेदवारांचे अर्ज वैध; 21 ऑक्टोबरला मतदान
Maharashtra Election (FIle Image)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 (Maharashtra Vidhan Sabha Elections) साठी राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आगामी विधानसभा निवडणूकीसाठी राज्यात उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 4 ऑक्टोबरपर्यंत मुदत होती. यानंतर महाराष्ट्रात नामनिर्देशनपत्रांच्या छाननीत 5543 अर्ज आले होते. यापैकी 4739 अर्ज वैध ठरले आहेत. तर 798 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उमेदवारी अर्जांवरही विरोधकांकडून आक्षेप घेण्यात आले होते मात्र निवडणूक आयोगाने त्यांच्या अर्जांना मंजूर केले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: PwD App च्या मदतीने दिव्यांग मतदार घरबसल्या करू शकतील मतदार नोंदणी ते व्हिलचेअरसाठी विनंती

नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघात सर्वाधिक 135उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यापाठोपाठ पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात 85 उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे दाखल केली. सर्वात कमी नामनिर्देशनपत्रे मुंबईतील माहिम आणि शिवडी या मतदारसंघांमध्ये दाखल करण्यात आली आहेत. Maharashtra Assembly Elections 2019: मतदार यादीत तुमचे नाव कसे तपासाल, जाणून घ्या सोप्प्या स्टेप्स

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 कार्यक्रम

27 सप्टेंबर : निवडणुकीची अधिसूचना

4 ऑक्टोबर : उमेदवारी अर्जासाठी मुदत

5 ऑक्टोबर : उमेदवारी अर्जांची छाननी

7 ऑक्टोबर : अर्ज मागे घेण्याची मुदत

21 ऑक्टोबर : मतदान

24 ऑक्टोबर : मतमोजणी

दरम्यान सध्या अस्तित्त्वात असलेल्या महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबर पर्यंत आहे. 2014 साली झालेल्या विधानसभेच्या निवडणूकीमध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक 122 जागा,शिवसेनेस 63, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला 42 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या होत्या.