मुंबईत बारबालांवर 47 जणांनी पैसे उधळले, अनाथाश्रमात सर्व पैसे जमा करा - कोर्टाचे आदेश
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

मुंबईत (Mumbai) शनिवारी (25 मार्च) रात्री पोलिसांनी इंडियाना बार आणि रेस्टॉरंट येथे धाड टाकली. त्यावेळी 47 जण बारबालांवर पैशांची उधळण करत होते. यावेळी पोलिसांनी सर्व आरोपींनी  अटक करण्यात आली. तसेच जमिनासाठी आरोपींनी प्रत्येकी 3000 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

तर रविवारी (24 मार्च) हॉलिडे कोर्टाने या सर्व पुरुषांना कोर्टामध्ये सुनावणीसाठी उपस्थित करण्यात आले. या आरोपींमध्ये बार मॅनेजर,कर्मचारी आणि ग्राहक यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. मात्र जास्त करुन ग्राहक हे गुजरात आणि मध्य प्रदेश येथील राहणारे असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.(हेही वाचा-कोल्हापूर: चहा दिला नाही म्हणून पतीकडून पत्नीची गळा आवळून हत्या; आरोपी स्वत:हून पोलिसात हजर)

सुरुवातीला कोर्टाने या सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावली. परंतु त्यांच्या वकिलांनी या निर्णयाचा विरोध केला. त्यामधील एका वकिलाने असे म्हटले की, हा प्रकार पहिल्यांदा आणि शेवटचा असणार आहे. त्यामुळे तुम्ही त्यांना कोठडी सुनवणे योग्य नाही. मात्र कोर्टाच्या न्यायमुर्तींनी यावर विचार करत असे सांगितले की, बारबालांवर उधळलेल्या पैशांच्या आरोपाखाली अटक झालेल्या लोकांनी प्रत्येकी 3 हजार रुपये जामिनासाठी पोलिसांकडे द्यायचे आहेत. तसेच हा सर्व पैसा बदलापुर येथील अनाथाश्रमामध्ये दान करण्यात येणार असल्याचे कोर्टाने सांगितले आहे.