महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव अधिकच वाढू लागला आहे. राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधित मुंबई आणि पुणे शहरात आढळून आले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव अटोक्यात आणण्यासाठी सरकारकडून विविध योजना केल्या जात आहेत. दरम्यान, मुंबईत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. परंतु, पुण्यात कोरोनाचे संकट आणखी गडद होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात 3 ठिकाणी जम्बो (Jumbo hospitals) रुग्णालयांची उभारणी करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी निर्देश दिले आहेत. तसेच खाजगी रुग्णालयात आकरले जाणारे बिल सरकारी दरानुसार आहेत की नाही? याचीही तपासणी केली जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

कोरोना उपचारासाठी खासगी रुग्णालयातून मोठ्या रक्कमांची बिले आकारली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. खासगी रुग्णालयाचे बिल स्वतंत्र लेखा परीक्षकांच्या माध्यमातून तपासली जातील. शासनाच्या नियमानुसार उपचारांची दर आकारणी केली आहे का? याची शहानिशा करूनच रुग्णाला बिल दिले जावे, याबाबत सबंधित यंत्रणेने दक्षता घेण्याच्या स्पष्ट सूचनाही अजित पवार यांनी यावेळी दिल्या आहेत. तसेच, पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित संभाव्य रुग्णसंख्या लक्षात घेऊन तातडीने 3 ठिकाणी जम्बो रुग्णालयांची उभारणी करण्याचे निर्देशही यावेळी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले आहेत. हे देखील वाचा- ऑटोरिक्षाचे स्टिअरिंग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे, पण कुठे जायचे हे मागे बसलेले ठरवतात- देवेंद्र फडणवीस

ट्वीट-

तसेच, कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य यंत्रणा अहोरात्र धडपड करत आहेत. दरम्यान, कोणत्याही परिस्थिती कोरोना आणखी प्रादुर्भाव वाढू नये, याची दक्षता घ्यावी लागणार आहे. करोना प्रतिबंधक उपाययोजना सोबतच आरोग्य विषयक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वेतोपरी सहकार्य करण्यात येणार आहे. याशिवाय कोरोना प्रतिबंधक तातडीच्या उपाययोजनांसाठी तसेच मंत्रालयस्तरावरील प्रश्न तातडीने मार्गी लावणार असल्याचेही अजित पवार यांनी म्हटले आहे.