Pune: सासरवाडी गेलेल्या 26 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या; चार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
Muder प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

Pune: पत्नीसह सासरवाडीच्या शेतात फिरायला जात असताना नवविवाहित तरुणाची चौघांनी वार करून हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील गहुंजे परिसरात उघडकीस आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सूरज काळभोर (वय 26, रा. आकुर्डी) असे पीडित तरुणाचे नाव आहे. तो पुण्यातील एका खासगी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये कर्मचारी होता.

काळभोर यांचा चार महिन्यांपूर्वी विवाह झाला असून रविवारी ते सासरच्या मंडळींना भेटायला गेले होते. काळभोर हे त्यांच्या पत्नीसह त्यांच्या सासरच्या शेतात फिरायला गेले असता चार अज्ञात व्यक्तींनी त्यांच्याजवळ येऊन धारदार शस्त्रांनी अमानुष वार केले. (हेही वाचा - Sangli Reliance Jewels Showroom वर सशस्त्र दरोडा, 14 कोटी रुपयांचे दागिने लंपास; दरोडेखोर बॅग विसरल्याने हिरे सलामत)

या हल्ल्यात सूरज काळभोर गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. काळभोर हे एका खाजगी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये कर्मचारी होते, त्यांची आई PCMC संचालित क्लिनिकमध्ये काम करते. (हेही वाचा - Pune: भाड्यावरून झालेल्या वादामुळे संतापलेल्या ऑटोचालकाने प्रवाशाच्या कानाला घेतला चावा; आरोपीविरोधात गुन्हा दाखल)

याप्रकरणी तळेगाव धाबडे पोलिस ठाण्यात अज्ञात चार जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. दरम्यान या घटनेने गहुंजे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.