taj hotel cr - Wikimedia Commons

26/11Mumbai Attack:  मुंबई (26/11 ) दहशतवादी हल्ल्यातून एक मोठी माहिती समोर आली आहे. मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्या प्रकरणी आरोपी तहव्वूर राणा (Tahhvur Rana) विरोधात किल्ला कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने राणाविरोधात 405 पानी आरोपपत्र दाखल केले आहे. पाकिस्तानी लष्करात डॉक्टर असलेला तहाव्वूर राणा हा आयएसआय आणि लष्कर-ए-तय्यबाचा हस्तक आहे. मुंबईवरिल दहशवतवादी हल्ला प्रकरणात हे पाचवे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे,

मिळालेल्या माहितीनुसार, राणा सध्या अमेरिकेच्या तुरुंगात आहे. राणा याने डेव्हिड कोलमन हेडली याला सहकार्य केले असा आरोप त्याच्यावर आहे. एका पत्रकाराच्या हत्येचा आरोप त्याच्यावर आहे. लवकरच भारतात प्रत्यार्पण होणार आहे,  राणाकडे कॅनेडाचे नागरिकत्व आहे.  लष्कर-ए-तोयबाचा पाकिस्तानी-अमेरिकन दहशतवादी डेव्हिड हेडलीचाही कट रचण्यात समावेश होता.

 आता, आरोपपत्र दाखल झाल्याने त्याचे लवकरच भारतात प्रत्यार्पण होण्याची शक्यता आहे.