Coronavirus (Photo Credit: Twitter)

महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण (COVID-19 Patient) दिवसागणिक वाढत असून हा आकडा आता 1 लाखांच्या वर पोहोचला आहे. राज्यात काल दिवसभरात (23 जून) 3214 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून राज्यात (Maharashtra) कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 39 हजार 010 वर पोहोचली आहे. तसेच राज्यात गेल्या 24 तासांत 248 रुग्ण दगावले असून राज्यात एकूण मृतांचा आकडा 6531 वर पोहोचला आहे. राज्यात तब्बल 1925 लोक बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे बरे झालेल्या रुग्णांचा संख्या 69,931 वर पोहोचली आहे. तर सद्य घडीला 62,833 रुग्णांवर उपचार (Active Cases) सुरु आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक मुंबईत असून त्यापाठोपाठ ठाणे, पुणे जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आहेत. ठाण्यात आतापर्यंत 56,506 कोरोनाचे रुग्ण आढळले असून पुण्यात 16,907 रुग्ण आढळले आहेत. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. BMC: मुंबई येथील धारावी परिसरात एकूण 2 हजार 189 कोरोनाबाधित; दिवसभरात आणखी 5 नव्या रुग्णांची नोंद

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी ( 23 जून रात्री 10 पर्यंत)

जिल्हा संक्रमित रुग्ण मृत्यू बरे झालेले रुग्ण
मुंबई 68410 3844 34,576
ठाणे 56506 751 10766
पुणे 16907 624 9142
पालघर 3866 93 1154
औरंगाबाद 3686 201 1982
नाशिक 2965 179 1620
रायगड 2714 93 1711
जळगाव 2476 189 1267
नागपुर 1352 13 897
अकोला 1272 66 788
सातारा 868 40 632
सोलापुर 2345 215 1170
कोल्हापुर 750 8 691
रत्नागिरी 504 23 352
धुळे 587 47 350
अमरावती 463 24 312
जालना 395 11 259
सांगली 302 9 172
नांदेड 295 11 178
अहमदनगर 300 12 224
हिंगोली 262 1 226
यवतमाळ 251 8 161
लातुर 227 13 149
उस्मानाबाद 183 6 130
सिंधुदुर्ग 164 4 144
बुलडाणा 176 9 117
गोंदिया 101 0 72
बीड 102 3 68
परभणी 85 4 74
नंदुरबार 89 5 52
भंडारा 77 0 49
वाशिम 79 3 44
गडचिरोली 60 1 47
चंद्रपुर 60 0 44
वर्धा 14 1 11
अन्य जिल्हे 117 20 0
एकुण 139010 6531 69631

तर दुसरीकडे भारतात आजवर एकुण 4 लाख 40 हजार 215 कोरोना बाधित आढळले असुन यापैकी सद्य घडीला 1 लाख 78 हजार 14 जण हे अ‍ॅक्टीव्ह रुग्ण असुन त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर 2 लाख 48 हजार 190 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. देशातील कोरोना मृतांचा आकडा सध्या 14011 वर पोहचला आहे. कोविड-19 चा प्रभाव जगभरात असून कोरोना बाधितांची संख्या आणि त्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा अमेरिकेत सर्वाधिक आहे.