Dharavi (Photo Credits: Wikimedia Commons)

Coronavirus Cases In Dharavi: जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO)कोरोनाला (Coronavirus) रोखण्यासाठी प्रशासनातर्फे राबवण्यात येत असलेल्या 'धारावी मॉडेल'ची (Dharavi Model) दखल घेण्यात आली होती. दाटवस्तीमुळे या भागातील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून देशापुढे धारावी मॉडेल प्रेरणास्थान बनले आहे. धारावीत राबवण्यात आलेल्या मॉडेलमुळे धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मात्र, आज धारावीतील कोरोना रुग्णांच्या आकड्यात पुन्हा वाढ झाल्याची दिसून येत आहे.

धारावीत (Dharavi) आज 23 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे धारावीतील एकूण रुग्णांची संख्या 2415 इतकी झाली आहे. सध्या धारावीतील 99 कोरोना रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यासंदर्भात मुंबई महानगरपालिके (Brihanmumbai Municipal Corporation) ने माहिती दिली आहे. (हेही वाचा - मुंबई महापालिकेला केंद्राकडून आतापर्यंत 446 व्हेंटिलेटर्सचा पुरवठा, COVID19 च्या रुग्णांचा रिकव्हरी रेट 70 टक्क्यांवर- BMC)

दरम्यान, राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण मुंबई शहरात आढळून येत आहेत. आज मुंबईमध्ये 1,390 कोरोना विषाणू रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबई शहरातील एकूण कोरोना संक्रमितांची संख्या 96,253 वर पोहचली आहे. मंगळवारी महाराष्ट्रात दिवसभरात 213 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर नवीन 6,741 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते.