Gadchiroli Crime News: महाराष्ट्रातील गडचिरोली एकाच कुटूंबातील पाच सदस्यांनी विष बाधामुळे मृत्यू झाला आहे. या घटनेअंतर्गत पोलिसांनी दोन महिलांना अटक केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडिलोपार्जित मालमत्तेच्या वादातून आणि अन्य कारणावरून दोन महिलांनी एकाच कुटुंबातील पाच जणांना विष देऊन हत्या केली आहे. जिल्ह्यातील महगाव, तहसील अहेरी येथे गेल्या काही दिवसांपासून शंकर पिरू कुंभारे, त्यांच्या कुटुंबातील चार सदस्यांसह, अचानक आजारी पडले आणि वीस दिवसांत त्यांचा मृत्यू झाला.
20 सप्टेंबर 2023 रोजी, शंकर कुंभारे आणि त्यांची पत्नी, विजया कुंभारे, दोघांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना अहेरी येथील रुग्णालयात हलवण्यात आले. नंतर त्यांना उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. दुर्देवाने, शंकर कुंभारे यांचे 26 सप्टेंबर 2023 रोजी निधन झाले, त्यानंतर त्यांची पत्नी विजया कुंभारे यांचे 27 सप्टेंबर रोजी निधन झाले.आनंदा उराडे १४ ऑक्टोबरला आणि रोशन कुंभारेचा 15 ऑक्टोबरला मृत्यू झाला. शंकर याचा मोठा मुलगा, विजय देखील दिल्लीहून चंद्रपूरला आला होता. दिल्लीत परतल्यानंतर त्याला देखील विष बाधा झाली. शंकर यांना उपचारासाठी रुग्णालयात नेणारा कार चालक याला देखील विष बाधा झाली होती. यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
एकाच कुटूबांतील पाच जणांचा मृत्यू झाल्याने योगायोगाने पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत तपास सुरू केला. गुपीत सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गावात शंकर कुंभारे यांची सून संघमित्रा कुंभारे आणि मेहुण्याची पत्नी रोझा रामटेके यांचा पाच जणांच्या गुन्ह्यात सक्रिय सहभाग असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन त्या दोघींच्या हालचालींवर पोलीसांनी बारकाईने लक्ष ठेवून त्यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर ही धक्कादायक बाब समोर आली.
महिला आरोपी संघमित्रा कुंभारे हिने रोशन कुंभारे याच्यासोबत तिच्या आई-वडिलांच्या विरोधात जाऊन लग्न केले. या कारणामुळे तिच्या वडिलांनी आत्महत्या केली. यानंतर पती रोशन आणि सासरचे मंडळी तिच्या माहेरच्या लोकांना वारंवार टोमणे मारायचे. सोबत रोझा हीनं सासऱ्याच्या नावे असलेली शेत जमिनीवरून हिस्सा मागून वाद सुरु केला. दोघींनी संपूर्ण कुंभारे कुटुंब आणि त्यांच्या नातलागांना विष देऊन जीवे ठार मारण्याची योजना केली.