1993 साखळी बॉम्ब स्फोट प्रकरणातील आरोपी अब्दुल गनी तुर्क याचा आज नागपूर तुरुंगात मृत्यू
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

अब्दुल गनी तुर्क (Abdul Gani Turk) ह्याला 1993 साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटाप्रकरणी (Serial Bomb Blast) आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती. तर अब्दुल ह्याला नागपूर मध्यवर्ती तुरुंगात (Nagpur Central Jail) ठेवण्यात आले होते. मात्र आज (25 एप्रिल)  नागपूर मधील तुरुंगात असणारा आरोपी अब्दुल ह्याला जीएमसी रुग्णालयात (GMS Hospital) गेल्यानंतर मृत घोषित करण्यात आले आहे. याबद्दल एएनआयने वृत्त दिले आहे.

12 मार्च 1993 रोजी अब्दुल ह्याने आरडीएक्स बागळत मुंबईतील सेंच्युरी बाजारातील बॉम्ब स्फोट घडवून आणला. तसेच अटक केल्यानंतर अब्दुल ह्याने कशा पद्धतीने बॉम्ब स्फोट घडवणून आणण्याचा प्रयत्न होता याबद्दल खुलासा केला होता.त्यामध्ये जवळजवळ 113 लोकांचा मृत्यू झाला होता. तसेच मुंबईत बऱ्याच ठिकाणी विविध आरोपींकडून साखळी बॉम्ब स्फोट घडवून आणले गेले.

त्यानंतर या प्रकरणाची अधिक चौकशी केली असता बऱ्याच दिग्गज मंडळींची नावेसुद्धा पुढे आली होती. तसेच दाऊद ह्याचे नावसुद्धा पुढे आले होते. तर याकूब मेनन ह्याला फाशी देण्यात आली होती. त्याचसोबत बॉम्ब हल्ल्यातील अन्य आरोपींना आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.