Nagpur Solar Project: महाराष्ट्रातील नागपूर येथे उभारण्यात येणारा सौरऊर्जा पॅनेल प्रकल्प गुजरातला गेला असल्याचा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारी यांनी केला. या प्रकल्पांअतर्गत १८ हजार कोटींची गुंतवणूक होणार होता. नागपूर येथे मोठा रिन्यूएबल अॅंड ग्रीन एनर्जी कंपनीचा सोलार पॅनल प्रकल्प येणार होता. या आधी देखील महाराष्ट्रातील एक नाही तर चार प्रकल्प गुजरात येथे देण्यात आला. त्यामुळे सराकारवर जोरदार टीका करण्यात आली. (हेही वाचा- 'Swachhata hi Seva' अंतर्गत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री Eknath Shinde यांनी गिरगाव चौपाटी वर घेतला स्वच्छता मोहिमेत सहभाग (Watch Video)
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी x वर ट्वीट करून सरकारवर टीका केली. पोस्टमध्ये लिहले आहे की, महायुती सरकारच्या नको त्या उद्योगांमुळे राज्यातील आणखी एक उद्योग गुजरातकडे गेला आहे. नागपूरमध्ये सोलर पॅनल प्रकल्प येणार होता.या प्रकल्पा अंतर्गत १८ हजार कोटींची गुंतवणूक होणार होती. राजकीय आणि प्रशासकीय उदासीनतेमुळे हे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याची माहिती पुढे आली आहे.
वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प, टाटा एअरबस विमान प्रकल्प आणि आता सोलर पॅनल प्रकल्प गुजरातमध्ये गेला आहे. हिंदू- मुस्लिम, जीभ कापा- जीभेला चटके द्या, पक्ष फोडा- आमदार पळवा... सतत असे निरर्थक उद्योग करणारे महायुती सरकार महाराष्ट्रात असल्यामुळे जगभरातील कॉर्पोरेट कंपन्या आणि उद्योगांना राज्यात उद्योग करणे कठीण झाले आहे. अधिकारी मंत्र्यांना खुश करण्यास व्यस्त आहे. मंत्र्यांची मस्ती, आमदारांचे नको ते लाड यामुळे महाराष्ट्राची पिछेहाट होत आहे आणि राज्यातील तरुणाचे रोजगार हिरावले जात आहेत असं त्यांनी पोस्टमध्ये लिहले आहे.
कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचे ट्वीट
महायुती सरकारच्या नको त्या उद्योगांमुळे राज्यातील आणखी एक उद्योग गुजरातकडे!
महाराष्ट्रात येणारा आणखी एक प्रकल्प गुजरातला गेला आहे. नागपूरमध्ये सोलर पॅनल प्रकल्प येणार होता. या प्रकल्पा अंतर्गत 18 हजार कोटींची गुंतवणूक होणार होती. राजकीय आणि प्रशासकीय उदासीनतेमुळे हे प्रकल्प…
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) September 19, 2024
१८ हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प अतिरिक्त बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात ३०० एकर जागेवर उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पातून जवळपास ३ हजार तरुणांना रोजगाराची संधी मिळाली असती. परंतु हा प्रकल्प गुजरात राज्यात जाणार असल्याने तरुणाने पुढील प्रकल्पाची वाट पाहावी लागणार.