Coronavirus in Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रात कालच्या दिवसभरात कोरोनाचे नवे 8493 रुग्ण आढळून आले असून एकुण कोरोनाबाधितांचा आकडा हा 6,04,358 वर गेला आहे. याशिवाय कालच्या दिवसात 228 जणांचा बळी गेल्याने आजवरच्या कोरोना मृतांची संख्या ही 20,265 वर पोहचली आहे. या संदर्भात सविस्तर माहिती देताना आरोग्य विभागाने सांगितल्यानुसार, राज्यात कोरोनाचे एकूण 1,55,268 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर दुसरीकडे 4,28,514 जणांनी आज वर कोरोनाला हरवुन आपआपला जीव वाचवला आहे. मुंबईत गेल्या आठवड्यात COVID19 च्या रुग्णांचा आकडा दुप्पटीने वाढला- BMC

राज्यात मुंबई, पुणे हे भाग अजुनही कोरोनाचे हॉटस्पॉट असल्याचे दिसत आहेत तर काही दिवसांपुर्वी कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळालेल्या ठाणे, कल्याण- डोंंबिवली भागात आता परिस्थिती नियंत्रणात आहे. औरंगाबाद, सातारा, सांंगली या भागात सुद्धा कमी संख्येने मात्र कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक वाढतच आहेत. या परिस्थितीत तुम्ही राहत असणारा जिल्हा किती सुरक्षित आहे व तुमच्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत हे जाणुन घेउयात.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांंची जिल्हानिहाय आकडेवारी

जिल्हा उपचार सुरू मृत्यू बरे झालेले रुग्ण संक्रमित रुग्ण
Ahmednagar 3322 142 9672 13136
Akola 470 139 2667 3277
Amravati 1150 97 2388 3635
Aurangabad 5904 578 12226 18708
Beed 1721 61 927 2709
Bhandara 182 5 346 533
Buldhana 846 66 1494 2406
Chandrapur 436 7 622 1065
Dhule 1502 157 3607 5268
Gadchiroli 100 1 428 529
Gondia 245 10 541 796
Hingoli 295 22 706 1023
Jalgaon 5192 692 12415 18299
Jalna 1335 114 1837 3286
Kolhapur 6706 382 7153 14241
Latur 2560 205 2586 5351
Mumbai 17704 7173 104301 129479
Nagpur 6959 365 6670 13995
Nanded 2098 141 1763 4002
Nandurbar 337 53 794 1184
Nashik 9882 676 16593 27151
Osmanabad 1758 98 1855 3711
Palghar 6318 502 14580 21400
Parbhani 909 52 559 1520
Pune 39424 3247 89810 132481
Raigad 4922 588 18115 23627
Ratnagiri 1159 103 1608 2870
Sangli 2664 217 3837 6718
Satara 2767 235 4588 7591
Sindhudurg 180 12 445 637
Solapur 4624 633 9295 14553
Thane 19818 3351 91726 114896
Wardha 134 10 234 379
Washim 418 21 810 1249
Yavatmal 727 50 1316 2093
Other states/country 500 60 0 560
Total 155268 20265 428514 604358

दरम्यान, महाराष्ट्रात सध्या कोरोनाबाधित रुग्णांंचा रिकव्हरी रेट आणि मृत्यु दर पाहिल्यास राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 70. 9  टक्के एवढे आहे. तर, मृत्यूदर 3.35 टक्के एवढा आहे.