पुण्यात (Pune) आज आणखी 835 कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 46 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 74 हजार 933 वर पोहचली आहे. तर, आज 1 हजार 49 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 14 हजार 442 रुग्णांवर उपचार सुरु आहे. आतापर्यंत एकूण 3 लाख 64 हजार 444 जणांची तपासणी करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे महानगरपालिकेने दिली आहे. पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत.
महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित मुंबई आणि पुणे शहरात आढळून आले होते. सध्या मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आली आहे. परंतु, पुण्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची वाढ होऊ लागल्याने प्रशासनाचे दाबे दणाणले आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि सफाई कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत. हे देखील वाचा- BMC: मुंबई येथील धारावी परिसरात आज आणखी 4 रुग्णांची नोंद; कोरोनाबाधितांचा एकूण संख्या 2 हजार 672 वर
ट्वीट-
पुणे कोरोना अपडेट : सोमवार, १७ ऑगस्ट,२०२०
शहरात नव्याने ८३५ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकूण संख्या ७४,९३३ झाली आहे. तर १,०४९ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या १४,४४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील एकूण तपासणी आता ३,६४,४४४ झाली असून आज ४,६३५ टेस्ट घेण्यात आल्या. pic.twitter.com/dfc6BsP15k
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) August 17, 2020
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव महाराष्ट्रात 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाउन कायम ठेवण्यात आले आहे. कोरोना संसर्गाशी लढण्यासाठी मिशेन बिगिन अगेन अंतर्गत राज्यात देण्यात आलेल्या सवलतींसह 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन सुरु आहे. तसेच येत्या 1 सप्टेंबरपासून लॉकडाउन उघडणार की आणखी वाढवला जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.