Coronavirus Outbreak (Photo Credits: PTI)

मुंबईत (Mumbai) कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा आकडा गेल्या आठवड्यात दुप्पटीने वाढल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. तर कोरोनासह साथीच्या रोगांची प्रकरणे सुद्धा वाढत असल्याचे मुंबईत दिसून आली आहेत. तर 8 ऑगस्टला शहरातील कोरोनाबाधितांचा डबलिंग रेट 89 दिवसांवर पोहचण्यासह ग्रोथ रेट 0.79 टक्के होता. परंतु शनिवारी दुप्पटीचा रेट हा 83 दिवसांवर पोहचल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांचा सरासरी ग्रोथ रेट हा 0.84 टक्क्यांवर गेला आहे.

शहरात कोरोनासंक्रमितांचा दुप्पटीचा वेग हा 85 दिवस आणि ग्रोथ रेट 0.82 टक्क्यांनी कमी झाल्याचे रविवारी दिसून आल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. मुंबईतील डी-वॉर्ड म्हणजेच पेडर रोड आणि मलबार हिल या ठिकाणी कोरोनाच्या रुग्णांचा दुप्पटीचा वेगा सर्वाधिक असून तो 50 दिवसांवर पोहचला आहे. तर एम-ईस्ट वॉर्डमध्ये चेंबूर (ईस्ट) परिसरात सर्वात कमी कोरोनाबाधितांचा दुप्पटीचा वेग 119 दिवस आहे.(Maharashtra Police: मागील 24 तासांत महाराष्ट्र पोलिस दलात आढळले COVID-19 चे 93 नवे रुग्ण)

डी-वॉर्डात सुद्धा कोरोनाच्या रुग्णांचा ग्रोथ रेट 1.40 टक्के तर एम-ईस्ट वॉर्ड मध्ये सर्वात कमी ग्रोथ रेट 0.58 टक्क्यांवर पोहचला आहे. सरासरी ग्रोथ आणि डबलिंग रेट हा गेल्या सात दिवसांमधील आहे. रविवार पर्यंत मुंबईत कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 1,28,726 वर पोहचला तर 7133 जणांचा बळी गेला आहे. जुन 15 पर्यंत शहरात सरासरी डबलिंग रेट 28 दिवस आणि ग्रोथ रेट 2.49 टक्क्यांवर गेला होता. त्याननंतर 31 जुलैला डबलिंग रेट सुधारुन 77 दिवस आणि ग्रोथ रेट 0.9 टक्क्यांवर पोहचल्याचे महापालिकेच्या आकडेवारीतून समोर आले होते.