Maharashtra Police | (File Photo)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) फैलाव टाळण्यासाठी सरकारने घालून दिलेल्या नियमांचे नीट पालन होत आहे की हे पाहण्यासाठी रस्त्यांवर उतरून आपला जीव धोक्यात घालणा-या महाराष्ट्र पोलिसांमध्ये (Maharashtra Police) मात्र कोरोना बाधित रुग्णांची संख्या मात्र वाढत चालली आहे. मागील 24 तासांत महाराष्ट्र पोलिस दलातील 93 जणांना कोरोनाची लागण झाली असून राज्यात एकूण 12,383 महाराष्ट्र पोलिस कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. राज्यात 126 पोलिसांची कोरोना विरुद्धची झुंज अयशस्वी ठरल्यामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

तर 9929 पोलिसांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. सद्य घडीला राज्यात 2328 महाराष्ट्र पोलिस कोरोनावर उपचार घेत आहेत. Coronavirus In Mumbai Today: मुंबईत आज 1 हजार 10 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; 47 जणांचा मृत्यू

राज्यात काल (16 ऑगस्ट) दिवसभरात 11,111 रुग्ण आढळले असून 288 जणांचा बळी गेल्याची माहिती देण्यात आली आहे. यामुळे राज्यात एकूण कोरोनाबाधितांची आकडेवारी 5,95,865 वर पोहचली आहे. राज्यात काल दिवसभरात 8837 रुग्णांची प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनावर यशस्वीरित्या मात करणा-या रुग्णाची संख्या 4,17,123 वर पोहोचली आहे.

कालपर्यंत राज्यात रुग्ण बरे होण्याचा रिकव्हरी रेट 70% इतका झाला आहे. तर मृत्यूदर 3.36% इतका झाले. दरम्यान, राज्यातील मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह पुण्यात ही कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळुन येत आहेत. तसेच कोरोनाच्या प्रादुर्भावर नियंत्रण मिळवण्यासह हॉटस्पॉट ठिकाणी स्थानिक प्रशासनाकडून लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत.