मुंबईत (Mumbai) आज आणखी 1 हजार 10 कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 47 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 28 हजार 726 वर पोहचली आहे. यापैंकी 7 हजार 130 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि सफाई कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत. हे देखील वाचा- महाराष्ट्रात पोलीस दलात गेल्या 24 तासात आणखी 33 जणांची COVID19 ची चाचणी पॉझिटिव्ह तर एका कर्मचाऱ्याचा मृत्यू
एएनआयचे ट्वीट-
1,010 new #COVID19 cases, 719 recovered cases and 47 deaths reported in Mumbai today. Total number of cases now at 1,28,726 including 1,03,468 recovered/discharged cases, 17,828 active cases and 7,130 deaths: Brihanmumbai Municipal Corporation (BMC) #Maharashtra pic.twitter.com/No0V1KHS1x
— ANI (@ANI) August 16, 2020
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव महाराष्ट्रात 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाउन कायम ठेवण्यात आले आहे. कोरोना संसर्गाशी लढण्यासाठी मिशेन बिगिन अगेन अंतर्गत राज्यात देण्यात आलेल्या सवलतींसह 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन सुरु आहे. तसेच येत्या 1 सप्टेंबरपासून लॉकडाउन उघडणार की आणखी वाढवला जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.