धारावीत आज 17 जणांना कोरोना विषाणूची लागण; एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2106 वर पोहोचला
Dharavi slums in Mumbai. (Photo Credit: PTI)

धारावीत (Dharavi) आज 17 जणांना कोरोना विषाणूची (Coronavirus) लागण झाली आहे. त्यामुळे धारावीतील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2106 इतका झाला आहे. तसेच आतापर्यंत 77 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेने (Brihanmumbai Municipal Corporation) माहिती दिली आहे.

राज्यात कोरोना व्हायरसचे सर्वात जास्त रुग्ण मुंबईमध्ये आढळून येत आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून मुंबई शहरातील धारावी परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट बनला होता. परंतु, आता मुंबई शहर तसेच मुंबई उपनगरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. धारावीशिवाय अंधेरी, दहिसर, दादर भागात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे. (हेही वाचा - जालना जिल्ह्यात 18 जणांना कोरोना व्हायरसची लागण; पोलीस दलातील 2 कर्मचाऱ्यांचा समावेश)

दरम्यान, मंगळवारी मुंबईत 941 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर, 55 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या 60 हजार 142 वर इतकी झाली आहे. यातील 3 हजार 165 रुग्णांचा मृत्यू झाला असून 31 हजार 40 जणांनी कोरोनावर मात केली आहे. (हेही वाचा - Coronavirus: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज ठाणे येथील COVID19 रुग्णालयाचे ऑनलाईन उद्घाटन)

याशिवाय मंगळावीर महाराष्ट्रात 2 हजार 701 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. तर, 81 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 13 हजार 445 वर पोहोचली आहे. आतापर्यंत यातील 5 हजार 537 जणांचा मृत्यू झाला असून 57 हजार 851 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.