Coronavirus in Mumbai: कोरोनाचा धोका पुन्हा वाढला! मुंबईत आजही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ; पाहा संपूर्ण आकडेवारी
Coronavirus प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: PTI)

मुंबईत (Mumbai) अटोक्यात येत असलेला कोरोना (Coronavirus) पुन्हा एकदा डोके वर काढू लागला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली असताना आजही मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईत आज तब्बल 1 हजार 646 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे मुंबईत पुन्हा एकदा लॉकडॉऊन लागू करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता राज्यातील अनेक शहरात कडक निर्बंध लागू करण्यात आली आहे.

मुंबईत आज सापडलेल्या रुग्णांमुळे कोरोनाबाधितांची संख्या आता 3 लाख 40 हजार 277 वर पोहचली आहे. यापैकी 3 लाख 15 हजार 379 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर, 11 हजार 519 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 12 हजार 487 रुग्ण सक्रीय असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. हे देखील वाचा- Coronavirus In Pune: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अवाहनानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रद्द केली पदाधिकाऱ्यांसोबतची बैठक

मुंबई महानगरपालिकेचे ट्वीट-

मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत गेल्या दोन महिन्यात एकूण 23 हजार 2 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 90 टक्के रुग्ण उंच इमारतीतील रहिवाशी आहे. तर, 10 टक्के रुग्ण झोपडपट्टी किंवा चाळीत राहायला आहेत. महत्वाचे म्हणजे, कोरोना विषाणूमुळे 170 टक्क्यांनी कंटेन्टमेंट झोनमध्ये वाढ झाली आहे. तर, सीलबंद इमारतींच्या संख्येत 66 टक्क्यांहून अधिक वाढली आहे.